अनोळखी व्यक्तीला एटीएमची माहिती सांगू नका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

रत्नागिरी - मोबाइल, फोनद्वारे कोणीही अनोळखी व्यक्तीने बॅंकेतून बोलतोय किंवा टोल फ्री नंबरवरून बोलतोय असे सांगून एटीएमची चौकशी केल्यास माहिती देऊ नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असल्यास तत्काळ बॅंकेशी संपर्क साधावा व कोणत्याही परिस्थितीत माहिती देऊ नये, असेही पोलिसांनी सांगितले.

पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे शहर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवाहन केले आहे. त्यानुसार तुमचे एटीएम ब्लॉक होणार आहे, तुमचा पासवर्ड सांगा, असे सांगणारे फोन आल्यास पासवर्ड सांगू नये. तुमचे मोबाइल फोनमध्ये मेसेजद्वारे बक्षीस लागल्याचे कळवल्यास व फोनद्वारे अकाऊंट नंबरद्वारे पैसे भरण्यास सांगितल्यास पैसे भरू नये. सहा महिने, एक वर्ष, दीड वर्षामध्ये पैसे दुप्पट करून देतो, असे सांगणाऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये पैसे भरू नयेत. तसेच सोने, चांदी पॉलिश करून देतो असे सांगणारे कोणाही व्यक्तीकडे दागिने पॉलिश करण्यासाठी देऊ नये. नागरिकांनी या आमिषाला बळी न पडता सतर्क राहावे. तसेच पोलिस ठाणे दूरध्वनी क्र. 02352-222333 व पोलिस नियंत्रण कक्ष क्र. 222222 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे शहर पोलिसांनी आवाहन केले आहे.

Web Title: Don't give ATM info to anyone