‘अर्क साका निवारका’मुळे हापूसच्या दर्जात होणार वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

रत्नागिरी - आंब्याच्या आतमध्ये होणारा साका टाळण्यासाठी ‘अर्क साका निवारक’ हे पर्यावरणपूरक औषध विकसित केले आहे. त्याचे यशस्वी प्रयोग गेल्या चार वर्षात रत्नागिरी, देवगडमध्ये झाले. त्या औषधांच्या निर्मितीमुळे आंब्याचा दर्जा वाढेल, असे प्रतिपादन बेंगलोर येथील भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी केले. ‘हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना’ या विषयांवर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. 

पणन मंडळ, सुपर मार्केट गरोसरी सप्लाईज, भारतीय बागवानी अनुसंधान संस्था (बंगळूर) यांच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू ढवळे, उपसभापती संजय अहिरे, मधुकर दळवी, प्रकाश साळवी, विनोद कुमार व विभागीय व्यवसाय अधिकारी रूपेश सयाल, डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.

डॉ. रवींद्र म्हणाले, हापूसच्या अंतर्भागात साका निर्माण होतो. बाहेरील बाजूने साक्‍याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आंबा फळ परिपक्व झाल्यानंतर त्याची विक्री होते. ग्राहकांनी आंबा खरेदी केल्यानंतर आत साका आढळल्यास ग्राहक आंबा खरेदीकडे पाठ फिरवतात. त्याचा परिणाम देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेवर झाला आहे. २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने ‘आर्क साका निवारक’ हे औषध तयार केले. त्यानंतर २०१५ मध्ये पणनच्या सहायोगाने कोकणातील शंभरहून अधिक बागांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. औषध फवारणी करताना फवारा किंवा फळ द्रावणात बुडवून करण्याच्या दोन पद्धती आहेत. काढणीपूर्व फळे बुडविण्यासाठी २० ते २५ फुटांपर्यंत नवे साधन विकसित केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr V Ravindra comment