टायरचोरी प्रकरणाला नाट्यमय वळण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

कणकवली- आलिशान गाडीच्या टायरचोरी प्रकरणाला नाट्यमय वळण लागले आहे. चोरीची माहिती गुप्त ठेवण्यासाठी संशयित आरोपीकडून वीस हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी आज शहरातील एका बड्या व्यापाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आली. भालचंद्र चंद्रशेखर वरवडेकर (वय 25 रा. कणकवली) असे त्याचे नाव आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. या प्रकरणातील संशयित आरोपी चिन्मय गणेश आचरेकर याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

शहरातील जयानंद फाटक यांच्या आलिशान गाडीच्या टायरची चोरी 26 जुलैला मध्यरात्री झाली होती. या प्रकरणी चिन्मयला काल (ता. 6) पोलिसांनी अटक केली होती; परंतु या संशयित चिन्मय हा टायर बदलत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. हे फुटेज काढून टाकतो. त्याची माहिती गुप्त ठेवतो, असे सांगून संशयित आरोपी भालचंद्र याने 2 ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता शहरातील कामतसृष्टी इमारतीलगत चिन्मयकडून पैसे मागितले होते. या वेळी चिन्मयने आपल्या गळ्यातील चैन विकून संशयित आरोपी भालचंद्र याला 20 हजार रुपये दिले होते. त्यानंतर पुन्हा त्याने पाच हजारांची मागणी केली होती. हे प्रकरण मिटविण्यासाठी काल दुपारी चिन्मय हा फिर्यादी यांच्याकडे आला होता. या वेळी चिन्मयला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर चिन्मयची आई पूजा (वय 54) यांनी येथील पोलिसात काल मध्यरात्री भालचंद्र यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. गाडीच्या टायर चोरीची माहिती गुप्त ठेवण्यासाठी आपल्या मुलाकडे 20 हजारांची खंडणी मागितली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी भालचंद्र याला रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गॅंग कार्यरत?
शहरात गतवर्षी रॉनी गॅंगच्या नावाने बड्या व्यापाऱ्याच्या मुलाचे कृत्य समोर आले होते. याच पार्श्‍वभूमीवर टायर चोरीतील संशयित आरोपी आणि इतर साथीदार यांची गॅंग शहरात कार्यरत आहे काय? या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी आलिशान गाड्यांमध्ये फिरून घरफोड्या करण्यामागे शहरातील तरुणांचा सहभाग असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Dramatic turn tire theft case

टॅग्स