घरबसल्या मिळणार कोकणचा मेवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

कणकवली : कोकणातला उकडा तांदूळ, गावठी पोहे, हिराची केरसुणी, खडखडे लाडू, खोबरावडी आदी सर्वच वस्तू ग्राहकांना ऑनलाइनच्या माध्यमातून घरपोच मिळणार आहेत. कोकण इ मार्केटच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाला. याबाबतची माहिती अमित आवटे, हरीश गणपत्ये, आकाश आवटे यांनी आज दिली.
 
अमित आवटे म्हणाले, ""कोकम सरबत, आवळा सरबत, फणसपोळी, मसाले, तांदूळ, चुरमुरे, शेंगदाणे लाडू आदींची विक्री या पूर्वी मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांत कोकणी जत्रांच्या माध्यमातून केली. कोकणात तयार होणारी सर्व उत्पादने ऑनलाइनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचविण्याची संकल्पना तयार झाली. गेले वर्षभर ऑनलाइन प्रक्रिया, कोकणातील विविध गुणवत्तापूर्ण वस्तूंचे विक्रेते, बचतगट आदींची चर्चा करून कोकणमार्केट डॉट कॉम या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आम्ही यशस्वी झालो.‘‘

या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अतुल काळसेकर आदी उपस्थित होतो. कोकणातील उत्पादनांच्या ऑनलाइन विक्री सेवेसाठी अभिनेते भाऊ कदम ब्रॅंड ऍम्बॅसिडर आहेत.
 
कोकणी मसाले, विविध चटण्या, सांडगी मिरची, आमरस, आंबावडी, आंबामेवा, आवळामावा, आवळा कॅंडी, फणसपोळी, खडखडे लाडू यांच्याबरोबरच सावंतवाडीची खेळणी, हस्तकला, दाभोळकर यांची पेंटिंग आदींचाही समावेश असल्याची माहिती दिली.

Web Title: Dried easily get Konkan