धरपकड मोहीम; अंमली पदार्थ रॅकेटबाबत एलसीबी सतर्क 

drugs issue kankavli taluka konkan sindhudurg
drugs issue kankavli taluka konkan sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वारगाव येथे गांजासह संशयिताला पकडल्याने अंमली पदार्थाचे रॅकेट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे. त्याचा छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. 

गांजा विक्री करणाऱ्या एकाला आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 726 ग्रॅम गांजासह 30 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. प्रवीण आत्माराम गुरव (वय 50) असे वारगाव येथून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. 

जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट गावागावापर्यंत पोचल्याची चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात मोहीम हाती घेतली आहे. यात तालुक्‍यातील वारगाव येथे गांजा विक्री होत असल्याची टीप गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वारगाव-रोडयेवाडी इथं छापा टाकला. या छाप्यात वारगाव-रोडयेवाडीतील प्रवीण आत्माराम गुरव (वय 50) याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीत एकूण 726 ग्रॅम वजनाचा ओला गांजा सापडला. 

प्रवीण गुरव याच्या ताब्यातील 29 हजार 40 रुपयांच्या गांज्यासह 500 रुपये किंमतीचा वजन काटा आणि रोख 560 रूपये, असा एकूण 30 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र बाबूराव शेळके, हवालदार जी. बी. कोयंडे, पोलिस नाईक प्रमोद काळसेकर, पी. एस. कदम, कृष्णा केसरकर, पोलिस कॉन्स्टेबल डी. ए. कांदळगावकर, एस. एस. खाडये, आर. एम. इंगळे, सी. आर. पालकर, सी. एस. नार्वेकर आदी सहभागी झाले होते. काल (ता.5) रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवीण गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com