खराब रस्त्यांमुळे एसटी सेवा बंद होण्याच्या मार्गावर 

सुनील पाटकर
मंगळवार, 3 जुलै 2018

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे व पावसाळी खड्ड्यांमुळे आर्थिक दृष्ट्या खोलात असलेली एसटी सेवा आणखीनच खड्ड्यात जाऊ लागली आहे. रायगडातील एसटी वाहतूक मार्ग असलेले तब्बल 76 रस्ते खराब असुन ते तातडीने दुरुस्त करण्याचे पत्रे विभागीय नियंत्रक यांनी बांधकाम विभागांना पाठविली आहेत. हे रस्ते वेळेत दुरुस्त न झाल्यास या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्याचा इशारा एसटी प्रशासनाने दिला आहे. या रस्त्यांमुळे गाड्यांच्या नुकसानाबरोबर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागणार आहे.

महाड - रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे व पावसाळी खड्ड्यांमुळे आर्थिक दृष्ट्या खोलात असलेली एसटी सेवा आणखीनच खड्ड्यात जाऊ लागली आहे. रायगडातील एसटी वाहतूक मार्ग असलेले तब्बल 76 रस्ते खराब असुन ते तातडीने दुरुस्त करण्याचे पत्रे विभागीय नियंत्रक यांनी बांधकाम विभागांना पाठविली आहेत. हे रस्ते वेळेत दुरुस्त न झाल्यास या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्याचा इशारा एसटी प्रशासनाने दिला आहे. या रस्त्यांमुळे गाड्यांच्या नुकसानाबरोबर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात एसटीचे जाळे आहे. दुर्गम भागात प्रवासाचे एकमेव साधन एसटी आहे. तर विद्यार्थ्यांना केवळ एसटीचाच आधार असतो. परंतु यात आता खराब रस्ते अडथळा ठरत आहेत. रायगड जिल्ह्यात बहुसंख्य रस्ते जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. सद्या जिल्ह्यातील ज्या मार्गांवर एसटी धावत असे 76 रस्ते खराब स्थितीत आहेत.पाऊस सुरु झाल्याने या रस्त्यांवरुन गाड्या चालवणे कठीण आहे.तरीही या फेऱ्या सुरु आहेत. परंतु पावसाचे प्रमाण वाढल्यावर खराब रस्त्यांवर गाडी चालवून  गाड्यांच्या भागांचे नुकसान होत असल्याने गाड्या बंद कराव्या लागत असतात आहेत.

रस्त्यांमध्ये आता खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक आगार प्रमुख व विभागीय नियंत्रकांनी 19 जूनला बांधकाम विभागांना या बाबत पत्र लिहिली आहेत व रस्ते व्यवस्थित नसल्यास वाहतूक बंद करावी लागेल असे स्पष्ट कळवले आहे परंतु तरीही रस्त्यांची स्थिती तशीच राहिल्याने खराब रस्त्यावर वाहतूक कधीही बंद होऊ शकते. जून महिन्यात पावसाचा जोर कमी असल्याने एसटी वाहतूक तरली परंतु यापुढे खराव रस्त्यांचा एसटीच्या सेवेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: due to bad roads stop ST services