निचरा होत नसल्याने महामार्गावरचा प्रवास पाण्यातून

सुनील पाटकर
बुधवार, 27 जून 2018

महाड - मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असून या कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे बुजल्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यातून वाट काढणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. चौपदरीकरणाचे काम करणा-या कंपनीकडून यंत्रसामुग्री वापरुन पाणी निचरा करण्याच प्रयत्न सुरु आहे. 

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरु असून ऐन पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणी खोदकाम व माती भराव झाला आहे.महामार्ग धोक्याचा असल्याचे वृत्त सकाळने यापूर्वी प्रसिध्द केले होते त्याचा प्रत्यय कालच्या मुसळधार पावसात आला. ऐन पावसाळ्यात महामार्गावर पावसाचे पाणी साचू लागले आहे. डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावर येवून तुंबून राहत आहे. तसेच महामार्गावर आलेले पाणी देखील गटारात जाण्याचा मार्ग माती भरावामुळे बंद झाला आहे. साचून राहिलेल्या पाण्याने वाहनचालक त्रस्त झाले असून अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे.महामार्ग बांधकाम विभागाकडून प्रतिवर्षी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची साफसफाई केली जाते. मात्र यावर्षी चौपदरीकरण कामामुळे गटारेच राहिलेली नाहीत. पाण्याला मार्ग मिळत नसल्याने इंदापूर ते पोलादपूर पर्यंत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचून राहिले आहे. दासगाव,केंवुर्ली , वहूर, पोलादपूर येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोट रस्त्यावर येत आहेत. खोदकाम झाल्याने पाण्याबरोबर माती देखील महामार्गावर येत आहे. यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना तयार झालेल्या चिखलाने अपघात होण्याची देखील शक्यता आहे. महामार्ग बांधकाम विभाग सध्या आपली जबाबदारी काम करणा-या एल अॅन्ड टी कंपनीवर सोपवून हात झटकत आहे.एल अॅन्ड टी कंपनीने पाणी साचू नये यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत 

Web Title: Due to lack of drainage it's difficult to travel on Mumbai Goa highway