मोबाईलची रेंज झाली गायब ; शिक्षणाचा झाला खेळखंडोबा
मात्र तालुक्यातील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
राजापूर : कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र तालुक्यातील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. गायब असलेल्या मोबाईल रेंजसह इंटरनेट सेवेअभावी डिजिटल युगामध्ये अनेक गावांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.
ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन आणि अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओच्या साहाय्याने शिक्षण देण्यावर शिक्षण विभागाने भर दिला आहे. त्यासाठी तालुक्यातील ३५ तंत्रस्नेही शिक्षकांनी विविध विषयांच्या विविध धड्यांवर आधारित शेकडोहून अधिक व्हिडिओही
तयार केले.
हेही वाचा - राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली -
या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गाडी काहीशी रुळावर येण्यास मदत झाली आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल ॲप वा टीव्हीच्या माध्यमातून शिकविले जात आहे. याचा फायदा तालुक्यातील काही गावांसह शाळांमधील विद्यार्थ्यांना होतो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमधील १५ हजार २४० विद्यार्थ्यांपैकी ११ हजार २२१ विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. ५ हजार एक विद्यार्थी मोबाईलद्वारे तर ८ हजार २३१ विद्यार्थी टीव्हीद्वारे शिक्षण घेत आहेत; मात्र त्याचवेळी चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
ऑनलाइन शिक्षण स्थिती
- तालुक्यात एकूण विद्यार्थी - १५,२४०
- ऑनलाइन शिकणारे - ११,२२१
- मोबाईलद्वारे शिकतात - ५००१,
- टीव्हीद्वारे शिक्षण घेणारे - ८,२३१
- मोबाईल नसणारे विद्यार्थी - २,८७०
- इंटरनेट सुविधा नसणारे - १,४२०
- टी. व्ही. नसणारे विद्यार्थी - १,७१७
हेही वाचा - रत्नागिरीतील चार पीआय आणि पीएसआयच्या बदल्या -
इंटरनेट सुविधा कमालीची स्लो
काही गावांमध्ये मोबाईल टॉवर उभे आहेत, मात्र ते कार्यान्वित नाहीत. काही गावांमध्ये महिनोन्महिने मोबाईल रेंज वा इंटरनेट सुविधा गायब असते. काही गावांमध्ये तर रेंज तुटकतुटक आहे. इंटरनेट सुविधा कमालीची स्लो. या साऱ्यांमुळे विद्यार्थ्यांसह लोकांना इंटरनेटद्वारे कोणतेही काम करणे कठीण वा एकमेकांशी संवाद साधणे वा ऑनलाइन शिक्षण घेणे कठीण झालेय.
संपादन - स्नेहल कदम