तौक्‍तेचा फटका! आंबा पल्पचे दर वधारणार

तौक्‍तेचा फटका! आंबा पल्पचे दर वधारणार
Summary

मे महिन्याच्या मध्यात तौक्‍ते च्रकीवादळाने कोकण किनारपट्टीला फटका बसला. या वादळामुळे हापूसची मोठ्या प्रमाणात गळ झाली.

रत्नागिरी : तौक्‍ते चक्रीवादळाच्या (cyclone) तडाख्यामुळे यंदाचा हापूस हंगाम दहा दिवस आधीच संपुष्टात आला. कॅनिंगसाठी शेवटच्या टप्प्यात कमी आंबा (Mango) मिळाल्याने पल्पचे दर वधारण्याची शक्‍यता आहे. किलोला पंचवीस रुपयांनी दर वाढू शकतात. दरवर्षीच्या तुलनेत यंदा चाळीस टक्‍केच आंबा प्रक्रियेसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आंब्याबरोबरच यावर्षी आमरसही आंबटच राहण्याची शक्‍यता आहे. (due to the cyclone, this year has season has ended ten days earlier)

तौक्‍तेचा फटका! आंबा पल्पचे दर वधारणार
रत्नागिरी : कोरोना लढ्यात ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्या - मुख्यमंत्री

वातावरणातील बदलांचा परिणाम यंदाच्या हापूस हंगामावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. उत्पादनात मोठी घट झाली. मे महिन्याच्या मध्यात तौक्‍ते च्रकीवादळाने कोकण किनारपट्टीला फटका बसला. या वादळामुळे हापूसची मोठ्या प्रमाणात गळ झाली. त्याचा परिणाम कॅनिंग व्यवसायावर होऊ लागला आहे. काहींनी 50 टक्‍के तर काहींना प्रक्रियेसाठी मालच उपलब्ध झाला नाही.

तौक्‍तेचा फटका! आंबा पल्पचे दर वधारणार
'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' अंतर्गत सव्वालाख लोकांची तपासणी

वादळामध्ये पडलेला माल अनेकांनी कॅनिंगला दिला; मात्र चार दिवसात त्यावर अँथ्रॅकनोजचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ट्रकच्या ट्रकमधील आंबे कुजून गेले. सुरवातीला कॅनिंगचा दर किलोला 36 रुपये होता. वादळानंतर पुढील चार दिवस तोच दर 12 रुपयांपर्यंत खाली आला. शेवटच्या टप्प्यात तो 23 रुपयांवर स्थिरावला आहे. वादळाने मोठा फटका 1 हजार ते 1200 दोन हजार रुपये पेटी धरली. 24 लाख रुपयांचे नुकसान झाले.

तौक्‍तेचा फटका! आंबा पल्पचे दर वधारणार
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा 'तो' मेसेज फेकच!

वादळामुळे अनेकांनी आंबा प्रक्रिया व्यवसायाचा मुहूर्तच केला नाही. त्यांच्याकडील डबे तसेच शिल्लक राहिले. जिल्ह्यात चार मोठी तर 150 हून अधिक छोटी युनिटस्‌ आहेत. हंगामात सुमारे 18 ते 20 हजार मेट्रिक टन हापूसवर प्रक्रिया केली जाते. यंदा उत्पादनातील घट आणि तौक्‍ते वादळामुळे माल वाया गेल्याने अंदाजे 6 हजार मेट्रिक टनावरच प्रक्रिया झाल्याचा अंदाज आहे. साधारणपणे दरवर्षी परराज्यात कॅनिंगसाठी 40 हजार मेट्रिक टन आंबा जातो. त्यावरही यावर्षी परिणाम झाला. प्रक्रिया उद्योग दरवर्षी 45 दिवस चालतो.

तौक्‍तेचा फटका! आंबा पल्पचे दर वधारणार
रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; 'हवामान'चा अंदाज

यंदा तो 22 दिवसच सुरू राहीला. 23 मे पासून सुरवात होते. 25 एप्रिला आंबा कॅनिंग सुरू होते. 10 ते 15 जूनपर्यंत प्रक्रिया उद्योग चालतो. यंदा सुरू होण्यासाठीच 12 मे उजाडला आणि शेवटच्या टप्प्यात मालच मिळणे दुरापास्त झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने साडेआठशे ग्रॅमच्या पल्पच्या डब्याला 150 ते 180 रुपये दर मिळतो. यंदा तो दर 190 ते 210 रुपयांपर्यंत वाढेल. फेब्रुवारीनंतर पल्पच्या उपलब्धतेवरच शंका व्यक्‍त केली जात आहे.

हंगाम उशीरा लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रक्रियेसाठी माल अधिक मिळण्याची शक्‍यता होती; परंतु वादळामुळे त्यावर बंधने आली. दर्जेदार माल मिळू शकला नाही. त्याचा दरावर परिणाम होऊ शकतो.

- आनंद देसाई, प्रकियादार

(due to the cyclone, this year has season has ended ten days earlier)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com