प्यायला पाणी मिळावे म्हणून प्राण्यांसाठी खोदले झरे

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 16 एप्रिल 2018

रसायनी (रायगड) : कर्नाळा किल्ल्याच्या पश्चिम बाजुस पोसरी ग्रामपंचायतीच्या हद्दितील जंगलातील ओहोळात प्राणी व पक्षी यांना पाणी पिण्यासाठी काही ठिकाणी रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील पक्षीप्रेमी विनायक डुकरे आणि इतरांनी झरे खोदले आहे. त्यामुळे पक्षी व प्राणी यांना झऱ्यांवर पाणी पिण्यासाठी दिलासा मिळत आहे. 

कर्नाळा किल्ल्याच्या घनदाट जंगलात ससा, भेकर, रानडुक्कर, घोरपड, सरडा, माकड, वांणर, विविध प्रकारचे साप आदि प्राणी तसेच मोर, घुबड, पोपट, कबुतर, बगळे, कावळे आदि पक्षी आढळतात. दरम्यान यंदाच्या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे जंगलातील झरे आटु लागले आहे. त्यामुळे प्राणी व पक्षांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्राणी आणि पक्षी यांना जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पक्षीप्रेमी विनायक डुकरे आणि ओमकार डुकरे, प्रशांत पवार, धनेश डुकरे, हसमुख पाटील व हार्दिक डुकरे या त्यांच्या सहकार्यांनी श्रमदान करून ओहोळात झरे खोदले आहे. 

"ओढा, ओहोळ आटले असतील तर त्यामधील पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकानी खड्डा खोदुन पाणी मोकळ करून ठेवावे तसेच जंगलातील झऱ्यांत झाडाचा गळुन पडलेला पाला आणि धुप होऊन पडलेली माती साचुन बसते त्यामुळे पाणी तुंबून बसले असेल तर झऱ्यात बसलेला कचरा आणि माती काढुन टाकावी आणि पाणी मोकळ करावे. जेणे करून हे पाणी प्राणी व पक्षी यांना पिणे सहज शक्य होईल.", असे पक्षीप्रेमी विनायक डुकरे यांनी सांगितले. 

Web Title: Dug pots for animals to get water for drinking