पाली ग्रामपंचायत पुन्हा झाली पोरकी...

अमित गवळे
बुधवार, 4 जुलै 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या व सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली पाली ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाल (मुदत) सोमवारी (ता.२) सायंकाळी संपला. त्यामुळे अाता ही ग्रामपंचायत पोरकी झाली असुन येथे लवकरच प्रशासकाची नेमणूक देखिल करण्यात येणार आहे.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या व सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली पाली ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाल (मुदत) सोमवारी (ता.२) सायंकाळी संपला. त्यामुळे अाता ही ग्रामपंचायत पोरकी झाली असुन येथे लवकरच प्रशासकाची नेमणूक देखिल करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीला सरपंच नसल्याने नालेसफाई, सांडपाणी, वाहतूक कोंडी, दिवाबत्ती व पाणी पुरवठा असे अनेक प्रश्न उद्भवणार आहेत.तसेच बांधकाम परवाने व इतर दाखले मिळवतांना देखील अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालीकर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायतीच्या काळामध्ये किमान त्या-त्या वॉर्डामध्ये ग्रामपंचायत सदस्य व सरपंच्याच्या माध्यमातून काही प्रमाणात विवीध कामे होतात. मात्र अात समस्यांच्या तक्रारीसाठी नक्की कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न समग्र पालीकरांना पडला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
पाली ग्रामपंचायतीची निवडणुक रविवारी (ता.२७) मे ला होणार होती. मात्र पाली नगरपंचायत स्थापन व्हावी यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.१६) मे रोजी अपक्षांसह सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अाणि पाली ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला.

राज्यपालांच्या अध्यादेशाद्वारे तालुका मुख्यालयाला नगरपंचायतीचा दर्जा देणे सबंधी आदेश पारीत होते. तसेच उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील अंतीरम निर्णयाद्वारे सबंधीत प्रशासनाकडून वर्तमानपत्रात प्रसिध्दी न दिल्या कारणाने नगरपंचायतीची प्रक्रिया थांबली होती.परंतू सद्यपरिस्थीत राज्यपालांचा अध्यादेश पाली गावासाठी रद्द झाला नसून नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम लागणे हे प्रशासनाकडून अभिप्रेत होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला.

तिढा कायम
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २६ जून २०१५ रोजी अधिसूचना जाहिर केली. त्यानुसार पालीसह रायगड जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये होणार होते. त्यातील पाच ग्रामपंचयतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. मात्र पाली नगर पंचायत होण्यास तत्कालीन सरपंचासह काही सदस्यांनी तांत्रीक कारणांमुळे विरोध दर्शवला होता. त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी ग्रामपंचायत रद्द झाल्याने मधल्या कालावधीत पालीचा कारभार प्रशासक म्हणून तहसीलदार पाहत होते. १४ मार्च २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने पाली नगर पंचायतीला स्थगिती दिली. १२ मे २०१६ रोजी पाली ग्रामपंचायतीवर ग्रामसेवकांची प्रशासक म्हणून ग्रामविकास अधिकारी( ग्रामसेवक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०१६ पासून पाली ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा सरपंचांकडे आला. अाणि अात पुन्हा मुदत संपल्यामूळे प्रशासकाकडे गेला आहे.

पाली ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्यावर येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील पत्र मंगळवारी (ता.३) पाली-सुधागड पंचायत समिती गटविकास अधिकार्यांकडे पाठविले आहे. ग्रामविकास अधिकारी व सचिव म्हणून काम करणार आहे.
- ए.एस. जमधाडे, ग्रामविकास अधिकारी, पाली

ग्रामविकासक अधिकार्यांचे पत्र अजुन मिळाले नाही. हे पत्र अाल्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार विस्तार अधिकार्यांची नेमणूक प्रशासक म्हणुन करण्यात येईल.
- विनायक म्हात्रे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाली-सुधागड

पालीकर जनता व सर्व पक्षियांनी नगरपंचायत होण्याच्या मागणीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. त्यावर अजुन कार्यवाही झालेली नाही.
- बि.एन. निंबाळकर, तहसिलदार, पाली-सुधागड
 

Web Title: duration of pali grampanchayat is over