नाताळच्या सुट्टीत बल्लाळेश्वराच्या पालीत भाविकांची गर्दी

अमित गवळे 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पाली - अष्टविनायकापैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुट्टयांमध्ये हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल होत आहेत. त्यामुळे येथे प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्यावरून मार्ग काढतांना भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याची मागणी जोर धरत आहे.

पाली - अष्टविनायकापैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुट्टयांमध्ये हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल होत आहेत. त्यामुळे येथे प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्यावरून मार्ग काढतांना भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याची मागणी जोर धरत आहे.

खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यांमूळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, मिनिडोअर स्टॅन्ड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर, या ठीकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शाळा, महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस तर वाहतूकीवर अधिकच ताण येतो. पादचारी व विद्यार्थ्यांना येथून मार्ग काढणे अवघड होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्याची मागणी येथील नागरिकांकडुन वारंवार होत आहे.

वाहतूक कोंडी जटिल
वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी नाक्या-नाक्यावर वाहतुक पोलीस तैनात असुन देखिल अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतुक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखिल वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. अनेक वेळा वाहतुक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहचण्यास उशिर होतो.

बाह्यवळण मार्गाला मुहूर्त कधी ?
पालीच्या बाहेरुन बाह्यवळण(बायपास) मार्गाला मंजुरी मिळाली असुनही हा मार्ग लालफितीत अडकला आहे. या संदर्भात सकाळ मागील दोन तीन वर्षांपासून बातम्यांच्या पाठपुरावा करत आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास पालीतील वाहतूक कोंडीला आळा बसेल.

नवीन बायपाससाठी जमीन अधिग्रहण होणार
जुन्या बाह्यवळण मार्गाच्या नियोजनातील त्रुटी दूर केल्या आहेत. भविष्याचा वेध घेत व विळे-भागड एमआयडीसी डोळ्यासमोर ठेवून नवीन बाह्यवळण मार्गाचे नियोजन व सर्वे करण्यात आला आहे. नवीन मार्गात विस्तृत पावणे चार कोटींचा पूल देखील होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना या संदर्भातील फाईल सुपूर्द केली आहे. दिड महिन्यात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमिनी अधिग्रहण करण्यासाठी दहा कोटी रुपये मंजुर झाले आहेत. लागणार वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. या सर्वाला पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. बायपास साठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे.
राजेश मपारा, अध्यक्ष, सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती 

पालीतील वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे अतिशय अवघड होते. रस्ते अरुंद असल्याने खूप गैरसोय होते. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. 
किशोर गाढे, पर्यटक, रसायनी

Web Title: During the Christmas holiday, the crowd of devotees in Ballaleshwar