पाली-खोपोली महामार्गावर धुळीचा त्रास, अपघाताचा धोका

अमित गवळे 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पाली- वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. येथून वाहने जावून मोठ्या प्रमाणात धुरळा पसरत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांना त्रास होत आहे. 

पाली- वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. येथून वाहने जावून मोठ्या प्रमाणात धुरळा पसरत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांना त्रास होत आहे. 

मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने समोरून येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघाता होण्याची शक्यता आहे. तसेच धुरळा उडु नये म्हणून माती बसण्यासाठी पाणी देखील टाकले जात नाही. जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत. ही धूळ वाहन चालक, दुचाकीस्वार व प्रवाश्यांच्या नाकातोंडात जावून त्याचा त्यांना खुप त्रास होत आहे. त्यामुळे या महामार्ग रुंदीकरणाच्या कामात सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोप अनेक जण करत आहेत. 

यामुळे श्वसनाचा देखील त्रास होत असून, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महामार्गाचे सुरु असलेले काम, खड्डे आणि धूळ यामुळे चालक व प्रवाश्यांसह महामार्गा शेजारील दुकानदार, हॉटेल व्यवसायिक व रहिवाशी देखील हैराण झाले आहेत.  

या मार्गावर प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहन चालक बेजार झाले आहेत. धुरळयामुळे अनेकदा समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघताचा धोका आहे. ठेकेदारने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अमित निंबाळकर, वाहनचालक

Web Title: Dust trouble on Pali-Khopoli highway, danger of accidents