कोरगावकर की नेवगी?

अमोल टेंबकर
बुधवार, 28 डिसेंबर 2016

सावंतवाडी - येथील उपनगराध्यक्ष युतीचाच असेल, अशी राजकीय स्थिती आहे. यात भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी आणि अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांची नावे आघाडीवर आहेत; मात्र पहिली संधी कोणाला द्यावी, यावरून निवडीच्या पूर्वसंध्येला युतीत गृहकलहाची चर्चा आहे.

अंतर्गत गटबाजीचा फायदा विरोधी पक्षाला होऊ नये यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्नात दिसत आहेत. त्यामुळे उद्या (ता. २८) होणाऱ्या निवड प्रक्रियेत नेमकी कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक उद्या होत आहे. त्यासाठी शिवसेना आणि भाजपकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता काही झाले तरी उपनगराध्यक्षपदी युतीचाच नगरसेवक बसेल, असा दावा केला आहे. त्यासाठी भाजपातून निवडून आलेले नगरसेवक आनंद नेगवी यांच्यासह भाजपच्या विद्यमान महिला तालुकाध्यक्ष तथा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या नावाचा समावेश आहे.
युतीकडून दोनच नावे अंतिम असली तरी नेवगी आणि कोरगावकर या दोघात प्रथम कोणी उपनगराध्यक्षपद भूषवावे यात शीतयुद्ध सुरू आहे.

आपण भाजपचा अधिकृत उमेदवार असल्याने आपल्यालाच संधी मिळावी, असा दावा नेवगी यांचा आहे, तर आपण अपक्ष जरी निवडून आलो असलो तरी माझी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी, असे कोरगावकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आयत्यावेळी निर्माण झालेल्या गृहकलहात वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता शिवसेनेकडे सात नगरसेवक आहेत आणि भाजपचा एक मिळून आठ नगरसेवक होणार आहे. विद्यमान नगराध्यक्षांना एक आणि कास्टिंग वोट मिळून दोन मतांचा अधिकार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दहा मते त्यांच्याकडे होणार आहेत, तर अपक्ष असलेल्या कोरगावकर यांचे एक मिळून अकरा मते होणार आहेत, मात्र दुसरीकडे आज झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत काही झाले तरी उपनगराध्यक्षपद आमच्याचकडे येणार आहे, असा दावा केला आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीत आयत्यावेळी त्यांनी नाट्यमय घडामोडी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सौ. कोरगावकर या युतीसोबतच आहेत, परंतु या प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे सात आणि भाजपचा एक असे सदस्य आहेत, तर दुसरीकडे काँगेसचे आठ आहेत, तरीही मी थेट जनतेतून निवडून आल्यामुळे माझे एक मत आणि दुसरे कास्टिंग मत अशा दोन मतांचा अधिकार आहे. त्यामुळे काही झाले तरी आमचाच उपनगराध्यक्ष बसणार आहे.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी.

Web Title: dy. mayor election