ई-पेट्रोलिंगचे जाळे चोरट्यांनी भेदले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

रत्नागिरी - वाढत्या चोऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी शहरात ई-पेट्रोलिंग प्रणाली सुरू करण्यात आली होती; मात्र चोरट्यांनी ई-पेट्रोलिंगच्या जाळ्याला छेद देऊन एका रात्रीत 10 दुकाने फोडली. शहर पोलिसांपुढे हे एक मोठे आव्हान उभे केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. ते पुढील तपासासाठी सर्वत्र पाठविण्यात आले असून त्या दिशेने तपासाला गती दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी चोऱ्यांची गंभीर दखल घेऊन असून तत्काळ क्राइम कॉन्फरन्स बोलावली. 

शहरामध्ये दीड, दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत होत्या. चोरटे भरदिवसा बंद घरे, फ्लॅट, दुकाने फोडत होती. यामुळे पोलिस यंत्रणेबरोबर नागरिकही हैराण झाले होते. चोरट्यांची टोळी आधी बंद घरांची माहिती काढून ती फोडत होते. पोलिसांनी गस्त वाढविली होती; परंतु त्यामध्येही नेमकेपणा नव्हता. रस्त्यांवरूनच रात्रीची गस्त घातली जात होती. चोरटे गल्ल्यांमध्ये आणि आतल्या भागात लपून बसायचे पोलिस गस्तीची गाडी पुढे गेली की मागे चोऱ्या होत होत्या. याला प्रतिबंध घालण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी प्रायोगिक तत्त्वावर शहरात ई-पेट्रोलिंग सुरू केले. 

महत्त्वाच्या ठिकाणी काही अंतरावर टॅग बसविण्यात आले. त्यांच्या वेळा ठरविण्यात आल्या. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांची गस्तीसाठी नेमणुका असायच्या त्यांनी टॅग मशीन त्या-त्या वेळेत त्या ट्रॅकला लावून गस्त घालायची, अशी पद्धत होती. त्यामुळे काही झाले तरी त्या मार्गावर ठरलेल्या वेळेत कर्मचारी अधिकाऱ्यांना जाणे क्रमप्राप्त होते; मात्र कालांतराने ई-पेट्रोलिंग नावाला उरले. त्यातूनही पळवाटा निघू लागल्या. संबंधित अधिकारी, कर्मचारी ई-पेट्रोलिंगच्या नावाखाली पंचिंग करून पुढच्या कामाला जाऊ लागले. कालच्या चोऱ्यांनाही ढिसाळपणा कारणीभूत असल्याचे दिसते. जिल्हा पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन तत्काळ क्राइम कॉन्फरन्स बोलावली. चोऱ्यांबाबत यंत्रणेला चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. तसेच प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूूचना दिल्या. चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यामध्ये चोरट्यांचे चेहरे दिसत असून ते पुढील तपासासाठी सर्वत्र पाठविण्यात आले आहेत. 

पथदीप बंद असल्याने फावले... 
शहरातील गोखले नाका आणि इतर भागात एक दोन नव्हे; तर दहा चोऱ्या झाल्या; परंतु या भागात काही ठिकाणी पालिकेचे पथदीप अनेक दिवसांपासून बंद आहेत. या भागातील नगरसेवकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या इलेक्‍ट्रिक विभागाने वेळीच येथील दिवे बसविले असते, तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चांगल्या पद्धतीने आले असते. तसेच प्रकाश असल्यामुळे चोरी करण्याचे धाडसदेखील केले नसते, असे नगरसेवकांचे मत आहे.

Web Title: E-patrolling thieves