सुधागडामध्ये मान्सून पूर्व पर्जन्याचे अागमन

अमित गवळे
रविवार, 3 जून 2018

पाली : मान्सून अजुन जिल्ह्यात दाखल झाला नसला तरी शनिवारी (ता. २) व शुक्रवारी (ता.१) सुधागड तालुक्यात सोसाट्याच्या वार्‍यासह मान्सूनपुर्व मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोराच्या वार्‍याने घरांचे पत्रे उडाले. तर अनेक ठिकाणी झाडे वाकली व उन्मळून पडली होती. पावसामुळे परिसरातील गारवा वाढला असून मातीच्या गंधाने वातावरण प्रफुल्लीत झाले होते.

अचानक वरुण राजाचे अागमन झाल्याने सार्‍यांचीच तारांबळ उडाली. नेहमी प्रमाणे पाऊस अाल्या बरोबरच विज पुरवठा वारंवार खंडित होत होता. तसेच विटभट्टी व्यवसायिक व अांबा अाणि काजू बागायदार यांना या अचानकपणे आलेल्या पावसाचा फटका बसला. शनिवारी (ता.२) पालीत दुपारी मुसळधार पाऊस पडला. पहिल्या पावसात बच्चे कंपनी बरोबरच मोठ्यांनी देखील पावसात भिजण्याची मनसोक्त अानंद घेतला. उकाड्याने हैराण झालेला प्रत्येकजण पावसाच्या गारव्यामुळे सुखावला होता. त्याचबरोबर पावसामुळे शेतकरी राजाला देखील अाशेचे किरण दिसु लागले अाहेत. त्यांनी शेतीच्या कामास सुरुवात केली आहे

Web Title: early monsoon rains in sudhagad