उत्खननप्रश्नी इको सेन्सिटिव्ह गावांवर `वाॅच`

eco sensitive village mining issue konkan sindhudurg
eco sensitive village mining issue konkan sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कासार्डे, पियाळी, वाघेरी, फोंडा लोरेसह वैभववाडी तालुक्‍यातील अनधिकृतपणे सुरू असलेले सिलिका उत्खनन, वाशिंग प्लांट तसेच वाहतूक करणारे व्यवसायिकांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या गावातील उत्खननावर बंदी आणली जाईल. तसेच पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसून उत्खनन सुरू असलेल्यांवरही कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आज येथे दिले. 

मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथील प्रांताधिकारी कार्यालयात भेट देऊन सिलिका मायनिंग दंडात्मक कारवाईबाबत महसूल विभागाचे अभिनंदन करून आपल्या मागणीचे निवेदनही दिले आहे. यावेळी तहसीलदार रमेश पवार, मनसेचे कार्यकर्ते दया मेस्त्री, संतोष सावंत आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी राजमाने यांनी स्पष्ट केले की, काही ठिकाणी दंडात्मक कारवाई झालेली आहे; मात्र ज्या गटांमध्ये अनधिकृत व्यवसाय सुरू होते त्यातील गटांची माहिती भुमिअभिलेख कार्यालयाकडून मागितले आहे.

खनिकर्म विभागाकडून कोणत्या व्यवसायिकांना परवानगी दिली होती. याबाबतची यादी तयार करून येत्या 15 दिवसांत कारवाई करू, असे आश्‍वासन दिले आहे. याबाबत माजी आमदार श्री. उपरकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की कणकवली तालुक्‍यातील कासार्डे, लोरे, वाघेरी, पियाळी, वैभववाडीतील आचिर्णे या गावांमध्ये विनापरवाना उत्खनन सुरू आहे. यातील काही गावे वनसंज्ञा बफर झोन दाजीपूरमध्ये येत असून अशा प्रकारची सिलीका वाळू उत्खनन करणारे व पर्यावरणाला धोका पोहोचवत आहेत.

पर्यावरणाचे सर्व नियम डावलून मोठे उत्खनन होत आहे. या उत्खननामध्ये ट्रेडींगच्या नावावरती वाहतूक पास दिले जात आहेत. ते पास बोगस व बारकोड मॅच होत नसून ते पास बोगस असल्याबाबतची शक्‍यता आहे. याबाबत तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. दोन वर्षांपासून उत्खनन करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. प्रत्यक्ष कारवाई जागेवर जाऊन तहसिलदार पवार यांनी मोजमाप घेऊन विनापरवाना उत्खनन करणाऱ्यांना दंड ठोठावला आहे. त्याचा दंड कमी होण्यासाठी अपील दाखल होण्याची शक्‍यता आहे.

अपिल प्रलंबित असताना विनापरवाना उत्खनन केले जाते. त्यामुळे आपल्याकडे अपील दाखल झाल्यानंतर तत्काळ दंडासाठी सुनावणी व्हावी. दंडाचे अपील सुरू झाल्यानंतर जमिन मालकांशी करार केलेले प्लांटचे उत्खनन थांबविण्याची नोटीस देवून बंद करावेत. अनधिकृत वॉशिंग प्लांट उद्‌ध्वस्त करून विनापरवाना वाहतूक होणारी सिलीका वाळू कोल्हापूरच्या दोन्ही सिमेवरती विशिष्ट पथक बसवून कारवाई करावी. इको-सेंन्सेटिव्ह गावांमध्ये उत्खनन होत असेल तर पर्यावरण विभटागाकडे तक्रार करण्यात यावी. हा प्रश्‍न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 

...तर कारवाई करा 
बफर झोन असलेल्या गावांमध्ये विनापरवाना उत्खनन होत असलेल्या खाणींवरती तातडीने कारवाई करण्यात यावी. आचिर्णे (ता. वैभववाडी) सिलीका उत्खनन रेल्वे रूळापासून अवघ्या 43 मीटरवरती असून त्या रेल्वे रूळाला धोका पोहोचण्याची शक्‍यता आहे, याबाबत कारावाईची मागणी उपरकर यांनी केली. 
 
अशी आहे मागणी 
*इको सेन्सिटिव्ह झोनची तपासणी 
*पर्यावरण व प्रदूषण ना हरकत दाखला अनिवार्य 
* कर बुडवणाऱ्यांना दंडात्मक कारवाई 
* बफर झोन क्षेत्रातील परवाने निलंबित करावेत 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com