दिव्यांग, अार्थिक दुर्बल, पितृछत्र हरपलेल्या पाल्यांना मिळणार शैक्षणिक मदतीचा हात

अमित गवळे
शुक्रवार, 6 जुलै 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्यातर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल दिव्यांग, अार्थिक दुर्बल व पितृछत्र हरपलेल्या पाल्यांना शैक्षणिक स्तरावरील प्रगतशिल वाटचालीसाठी विशेष मदत केली जाणार आहे.. यासाठी गरजुंनी संपर्क साधण्याचे अावाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोणाने सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ ठाणे अनेक लोकोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम राबवित अाहे. सुधागड तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये १२ माध्यमिक शाळांमध्ये १३ व १४ जुलै व शहर विभागामध्ये ठाणे येथे २९ जुलै रोजी पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना, दिव्यांग (अपंग) व आर्थिकदृष्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच १० वी, १२ वी, पदवी परीक्षा पास, विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी आणि तालुक्यातील सर्व अभियंता व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. . तरी संबंधीत सुधागड तालुकावासीय विद्यार्थांनी व व्यक्तींनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, 10/ए- ४,दुर्वांकुर, सरोवर दर्शन सोसायटी, रायगड, चंदनवाडी, ठाणे 400602.पत्त्यावर मंगळवार, गुरुवार व शनिवार सायंकाळी ७ ते ९ वाजताा संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे (9820775089), शिक्षण समिती प्रमुख वसंत लहाने(9869467809), सरचिटणीस राजू पातेरे (8424855284)

Web Title: education he;p to blind financial week students