शिक्षणाधिकाऱ्यांच्या अचानक शाळा भेटीने शिक्षकांची पोलखोल

सुनील पाटकर
बुधवार, 27 जून 2018

महाड : ग्रामिण भागात शिक्षणाचा बट्याबोळ वाजत असल्याचे उदाहरण आज महाड तालुक्यात पहावयास मिळाले. महाड तालुक्यातील दापोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी अचानक भेट दिली आणि मास्तरांची पोलखोल झाली. त्यावेळी शाळेत मुले होती पण एकही शिक्षक मात्र हजर नव्हता.

महाड : ग्रामिण भागात शिक्षणाचा बट्याबोळ वाजत असल्याचे उदाहरण आज महाड तालुक्यात पहावयास मिळाले. महाड तालुक्यातील दापोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी अचानक भेट दिली आणि मास्तरांची पोलखोल झाली. त्यावेळी शाळेत मुले होती पण एकही शिक्षक मात्र हजर नव्हता.

अरुणा यादव यांनी स्वत शाळेचा केरकचरा काढला आणि मुलांचा परिपाठही घेतला. महाड तालुक्यात दापोली हे दुर्गम गाव आहे. या शाळेत सतरा मुले शिकत आहेत. गाव दुर्गम असल्याने शिक्षणाच्या नावाने येथे बोंबाबोंब आहे. या शाळेत शिक्षक उशिरा येत असल्याच्या तक्रारी गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी काल सकाळी दहा वाजता शाळेला अचानक भेट दिली या भेटीत केंद्र प्रमुख दीपक कासारे हे त्यांच्या सोबत होते. आणि धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेत बारा मुले हजर होती.

मुख्याध्यापक राकेश खर्डे यांच्यासह अन्य दोन शिक्षक येथे आहेत परंतु या शिक्षकांचा मात्र पत्ता नव्हता. उशिरा येणा-या गुरुजींना यादवबाई येथे येतील याची पुसटशी कल्पनाही नव्हती. यादवबाईंनी शाळेचा कचरा काढला. मुलांचा परिपाठ घेतला. सुमहगीत व प्रार्थना घेतली. आणि जेव्हा त्यांनी अभ्यास तपासणी केली त्यावेळी त्यांना शिक्षणाच्या आयचा... आठवणे बाकी होते. मुलांना वाचता येत नाही, गणित वजाबाकीचा तर पत्ताच नाही, चौथीला एकच मुलगी शाळेत असुन तीलाही वाचता येत नाही, भागाकार, गुणाकार तर विचारच करायला नको. अशी या शाळेची स्थिती पाहून मुलांचे भवितव्य काय हा प्रश्न ग्रामस्थांना पडणार आहे. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांच्या शाळेची वस्तुस्थिती यातून पुढे आली आहे. या प्रकारानंतर उशिरा शिक्षक वर्गात दाखल झाले. या बाबत अरुणा यादव यांच्याशी संपर्क साधला असता झालेली घटना मान्य करत अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

 

Web Title: education officer without informing visited school