Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी या दोन भावंडांनी लडवली युक्ती.....

eight relax bus service stoped in sadvli kokan marathi news
eight relax bus service stoped in sadvli kokan marathi news

साडवली (रत्नागिरी) :शिमगोत्सवात हजारो चाकरमानी कोकणात दाखल होतात व आराम बस मालकांना चांगला नफा मिळत असतो असे असले तरी कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव कोकणात होवु नये म्हणुन देवरुखच्या मुबीन मालगुंडकर व मुजिब हरचिरकर यांनी आपली न्यु नॅशनल ट्रॅव्हलची सेवा १८ तारखेपासुन बंद ठेवून लोकांचे आरोग्य जपले आहे.

१८ तारखेपासून ठेवली सेवा बंद
जिल्हाधीकारी मिश्रा यांनी खबरदारीचा उपाय म्हणुन नागरीकांनी प्रवास टाळावा असे आवाहन केले होते.माञ नागरीक प्रवास करतच होते.यावर आपण गाडीच सुरु ठेवली नाही तर प्रवाशी प्रवास करणारच नाहीत असे म्हणत मुबीन मालगुंडकर यांनी आपल्या ८ आरामबसची सेवा बंद ठेवली आहे.देवरुख बोरीवली दोन बस,गणपतीपुळे मुंबई दोन बस,रत्नागिरी बोरीवली चार बस अशा फेर्‍या बंद ठेवल्या आहेत.

जपली सामाजिक बांधिलकी

आरामबसचे चालक व सहकारी यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे मालगुंडकर यांनी सांगितले.आपल्याकडे एकुण ४० लोक काम करत आहेत.पैशापेक्षा कोरोनाच्या काळात माणसांचा जीव जपणे व शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे हे माझे पहीले कर्तव्य आहे. अशी भावना मालगुंडकर यांनी बोलुन दाखवली.या आरामबस देवरुखमध्ये उभ्या करुन ठेवलेल्या आहेत.देवरुखवासियांनी मुबीन मालगुंडकरांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com