Ram Damdas Kadam | 'रामदासभाई आता जोरात...', एकनाथ शिंदेंनी भर सभेतचं केली घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde gives signal to comeback of ramdas kadam in shivsena

'रामदासभाई आता जोरात...', एकनाथ शिंदेंनी भर सभेतचं केली घोषणा

शिवसेनेचे कोकणातील नेते रामदास कदम यांना मातोश्रीने दूर केल्याचं चित्र राजकारणात आहे. अनिल परब यांच्या राजकारणामुळे ते उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब गेल्याचं बोललं जातंय. याआधीही रामदास कदम यांच्या मुलाला पाडण्यासाठी परब यांनी खेळी केल्याचा आरोप कदमांनी केला होता. (Eknath shinde Meets Ramdas Kadam in Ratnagiri)

रामदास कदम यांचा विधानपरिषदेवरील कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा शिवसेना सत्तेत आली. मात्र कदम यांनी संधी डावलण्यात आली. रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही शिवसेनेच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीला रसद पुरवल्याचं रामदास कदम म्हणाले होते. मात्र आता कदम यांचं सेनेत राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी भर सभेत याबद्दल सुतोवाच केल्याने शक्यता वाढली आहे. (Ramdas Kadam Latest News)

हेही वाचा: न्यायालयातून बाहेर पडताच रामदास कदम म्हणाले, दडपशाही झेलत...

'जागर कदम वंशाचा' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. भाई तुमची आम्हाला आणि विधिमंडळातील युवा पिढीला गरज आहे, असं त्यांनी म्हटलं.

रामदास भाई तुम्ही आता केवळ साहित्यिक बनू नका बाळासाहेबांच्या काळातील तुम्ही फायरब्रॅन्ड नेते आहात. तुमची आम्हाला आणि समाजाला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. तुम्ही डोक्यात काही ठेवू नका सेकंड इनिंग जोरदार सुरू करा अशी आमची इच्छा आहे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत केलं.

त्यामुळे तुम्ही आता सक्रिय व्हावे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ‘भाई तुम्ही आम्हाला ज्येष्ठ आहात तुमच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही विधिमंडळात येत चला. आम्हाला तुमचा नेहमीच आधार वाटतो.’कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम, शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदारयोगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, युवा सेनेचे सिध्देश कदम यांच्या सह सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी माजी सदस्य, खेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कदम कुटूंबीयासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

सभेचे निमंत्रण पण

रामदास कदम म्हणाले, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळालाय. मला १४ मे च्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणे आले आहे. या सभेला मी उपस्थित राहणार नाही. कारण, आमच्या ग्रामदैवतेच्या उत्सवाला मला उपस्थित राहवे लागणार आहे. मात्र, त्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार आहे.

Web Title: Eknath Shinde Gives Signal To Comeback Of Ramdas Kadam In Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top