लोहा तालुक्यात निवडणुक आयोगाच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

भारत निवडणूक आयेागाने निर्धारीत केलेल्‍या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्‍यात मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षण कार्यक्रम कामास वेग आला असून मतदार यादी शुध्‍दीकरणाचे काम प्रभावीपणे होण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात गुरूवारी ( ता.19) गावपातळीवर चावडी वाचनाचा अभिनव उपक्रम राबविण्‍यात येत आहे. अशी माहिती लोहयाचे तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी माहिती दिली.

लोहा- भारत निवडणूक आयेागाने निर्धारीत केलेल्‍या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्‍यात मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षण कार्यक्रम कामास वेग आला असून मतदार यादी शुध्‍दीकरणाचे काम प्रभावीपणे होण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात गुरूवारी ( ता.19) गावपातळीवर चावडी वाचनाचा अभिनव उपक्रम राबविण्‍यात येत आहे. अशी माहिती लोहयाचे तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी माहिती दिली.

भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्‍या कार्यक्रमान्‍वये मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षणाचे काम जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिलीप कच्‍छवे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्‍या नियोजनात करण्‍यात येत आहे. लोहा तालुक्‍यातील नियुक्‍त 211 बिएलओ यांनी मतदारांच्‍या घरोघरी भेटी देवून दुबार, मयत, कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करण्‍यात आलेली आहे. सदरील काम अधिक प्रभावीपणे होण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात गुरूवारी ( ता.19 ) सकाळी 9 वाजता गावपातळीवर चावडी वाचनाचा अभिनव उपक्रम तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी राबविला आहे. सदर चावडी वाचनाच्‍यावेळी संबंधीत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश देण्‍यात आलेले आहेत.

दरम्‍यान, मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव आढळून आल्‍यास लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 व  1951 अन्‍वये संबंधीत मतदारावर फौजदारी गुन्‍हा दाखल होवून सहा महिण्‍याच्‍या कारावासाची तरतूद आहे. त्‍या अनुषंगाने मतदार यादीमध्‍ये एकसारखी नावे असलेली आणि एकसारखे फोटो असलेली अशा एकूण 6 हजार 701 दुबार नावे असलेल्‍या मतदारांना भारत निवडणूक आयोगाकडून नोटीसा बजावण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यांची सुनावणी ( ता. २८ जून व 11 जुलै) घेण्‍यात आली.

तसेच, पुढील सुनावणी (ता. 20 जुलै) तहसिल कार्यालय लोहा येथे घेण्‍यात येणार आहे. लोहा तालुक्‍यातील मतदारांनी त्‍यांचे नाव मतदार यादीत एकाच ठिकाणी असल्‍याची खात्री करावी. दुबार, मयत, कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची नावे वगळण्‍यासाठी बिएलओ यांना सहकार्य करुन, मतदार यादीचे शुध्‍दीकरण व पुनरिक्षण कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार एस. एम. देवराये, अव्‍वल कारकून पी.पी. बडवणे, प्रशांत आपशेटे, लिपीक एन.एम. सोनकांबळे, सुर्यकांत पांचाळ, विजय मुंडे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Election Commission's work are in progress in loha taluka