Ratnagiri : मंडणगड, दापोली नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vote
मंडणगड, दापोली नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मंडणगड, दापोली नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विविध ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान तर; २२ डिसेंबर २०२१ मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १८; तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल.

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती (जिल्हानिहाय)

ठाणे : मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),

रत्नागिरी : मंडणगड, दापोली,

सिंधुदुर्ग : कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,

  • अर्ज स्वीकारणे १ ते ७ डिसेंबर २०२१

  • छाननी ८ डिसेंबर

  • मतदान २१ डिसेंबर (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)

  • मतमोजणी २२ डिसेंबर

loading image
go to top