सुधागड तालुका संभाजी ब्रिगेड पदाधिकार्यांची निवड

अमित गवळे 
मंगळवार, 10 जुलै 2018

पाली : येथील मराठा समाज सभागृहामध्ये नुकतीच संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी सुधागड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

पाली : येथील मराठा समाज सभागृहामध्ये नुकतीच संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी सुधागड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

संभाजी ब्रिगेडची वैचारिक जडणघडण महापुरुषांच्या मानवतावादी, समतावादी व विज्ञाननिष्ठ विचारधारा व मुल्यांवर आधारलेली आहे. संभाजी ब्रिगेड परिवर्तनावादी विचारांवर चालणारे देशव्यापी सामाजिक संघटन आहे. तरुणांनी शिक्षण घेवून व्यवसाय व उद्योग क्षेत्रात पदार्पण करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे व सामाजिक कार्यात झोकून देवून काम करावे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बहुजन महापुरुषांची विचारधारा घराघरात पोहचावा असे आवाहन मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडचे कोकण प्रदेश अध्यक्ष सचिन सावंत देसाई यांनी यावेळी केले.

संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण प्रदेश अध्यक्ष सचिन सावंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक संपन्न झाली. दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष भुषण सिसोदे, कोकण प्रदेश उपाध्यक्ष अन्सार दांडेकर, माणगाव तालुका अध्यक्ष नितीन शिर्के यांची प्रमुख उपस्थितीती होती. यावेळी संभाजी ब्रिगेड सुधागड तालुका प्रभारी म्हणून ह.भ.प महेश पोंगडे महाराज यांची तर सुधागड तालुका अध्यक्षपदी दिनेश घोलप यांची यांची नियुक्ती करण्यात आली. 

तालुका उपाध्यक्षपदी महेश कदम, उपाध्यक्षपदी शैलेश जाधव, कार्याध्यक्षपदी मयुर जाधव, सचिवपदी मच्छिंद्र सावंत, सहसचिवपदी निलेश मांडवकर, खजिनदारपदी मंगेश यादव, सहखजिनदार अभिषेक जंगम, प्रवक्तेपदी निखिल फाटे, संघटकपदी रमेश विर, संपर्क प्रमुख गणेश शिंदे, वंदीप जाधव, भिम महाडिक आदी पदाधिकार्‍यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच संभाजी ब्रिगेडच्या पाली शहर अध्यक्षपदी राहुल साजेकर, उपाध्यक्षपदी अविनाश राउत, कार्याध्यक्षपदी शेखर पवार यांची निवड जाहीर करुन मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुपुर्द करण्यात आले.

Web Title: The election of office bearers of Sudhagad taluka Sambhaji Brigade