esakal | ऑक्‍टोबरपर्यंत गांधीगिरी नंतर मात्र ॲक्‍शन
sakal

बोलून बातमी शोधा

electricity bills are received from customers earliest in ratnagiri before october month

जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत १ लाख ५६ हजार २७ ग्राहकांकडून ७६ कोटी ७१ लाख रुपये थकबाकी आहे.

ऑक्‍टोबरपर्यंत गांधीगिरी नंतर मात्र ॲक्‍शन

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोना महामारीने महावितरणला थकबाकीचे ग्रहण लागले आहे. चार महिन्यांच्या एकत्रित बिलांच्या आकड्याने वीजग्राहक गरगरले. अनेकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने थकबाकीने उच्चांक गाठला. जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत १ लाख ५६ हजार २७ ग्राहकांकडून ७६ कोटी ७१ लाख रुपये थकबाकी आहे. थकीत ग्राहकांना फोन करा, भेटून या, अशी गांधीगिरी करण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत; मात्र ऑक्‍टोबरनंतर ॲक्‍शन सुरू होणार आहे.  

महावितरणचे जिल्ह्यात ५ लाख ७७ हजार ५२९ वीज ग्राहक आहेत. अजूनही दीड लाख ग्राहकांची थकबाकी आहे. त्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मंडणगड, दापोली, रत्नागिरी तालुक्‍यात महावितरणच्या विद्युत खांब, मुख्य वाहिन्या, डीपी आदींचे सुमारे ३० कोटींच्या वर नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे ग्राहकांना तीन ते चार महिने वीज बिल देण्यात आले नव्हते. अनलॉकला सुरवात झाली आणि महावितरणने एकदम चार महिन्यांची एकत्रित बिले ग्राहकांना दिली.

हेही वाचा - कोकणात महामार्गावर पीक सुकवण्याची वेळ

भरमसाठ आणि अव्वाच्या सव्वा बिलं आल्याच्या तक्रारी करत ग्राहकांनी त्याला विरोध केला. ग्राहकांना भरमसाठ बिले भरणेही शक्‍य नव्हते. महावितरण कंपनीने वसुली सक्तीची न करता ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिली. त्यानुसार काही ग्राहक भरत असले तरी अनेकांची थकबाकी आहे. ग्राहकांना फोन करून समजावून सांगा, मोठ्या थकबाकीदारांना भेटी देऊन गांधीगिरी मार्गाने समजूत काढून बिले भरण्यास प्रवृत्त करा, असे आदेश आहेत. मात्र ऑक्‍टोबरनंतर थकबाकी वसुलीसाठी ॲक्‍शन घेणे भाग पडणार आहे. महिन्याला साधारण ३० ते ३५ कोटीपर्यंत महावितरणची वसुली होते.
 

विभागवार थकबाकी

विभाग           ग्राहक                     थकबाकी

चिपळूण         ४२,४२६          २० कोटी ७३ लाख ६२ हजार
खेड               ४५,६३७          २१ कोटी  ८६ लाख ७३ हजार 
रत्नागिरी          ६७,९६४          ३४ कोटी ११ लाख ६२ हजार
 

प्रकार            ग्राहक                      थकबाकी


घरगुती           १,२६,४८३          ४० कोटी ७७ लाख
वाणिज्य              १९,२५३         १४ कोटी ६८ लाख ४७ हजार 
औद्योगिक             २,६९९          ७ कोटी ६३ लाख ४४ हजार
कृषी                          ७६         ६९ हजार 
इतर                  १,५५,९५१         ६ कोटी ४४ लाख १ हजार 
 

हेही वाचा - निराधारात परमेश्वर पाहणाऱ्या पिंगुळीतील दुर्गा

"ग्राहकांना देण्यात आलेली वीज बिले वापरलेल्या युनिटचीच आहेत. याबाबतचा गैरसमज काढून टाकावा. लॉकडाउनपासून वीज बिले न भरल्याने थकबाकीची रक्कम मोठी आहे. ग्राहकांना बिले भरण्याची सवलत दिली आहे. लवकरात लवकर वीज बिले भरून सहकार्य करावे."

 - देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, महावितरण कंपनी

संपादन - स्नेहल कदम 

loading image