रात्री महावितरणच्या दिव्याखाली राहू द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

जाधव कुटुंबीयांची मागणी; गेले दीड महिना अंधारात

दापोली - महावितरणने दुटप्पी भूमिका घेतली आहे. एकाला एक न्याय तर आम्हाला दुसरा, असा प्रकार आहे. या कारभारामुळे आम्ही गेले दीड महिना अंधारात वावरत आहोत. असेच राहायचे असेल तर रात्री महावितरणच्या रस्त्यावरील दिव्याखाली आम्हाला राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाकवली येथील रामचंद्र जाधव यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

याबाबत तहसीलदारांकडे निवेदन दिल्यानंतर त्यांना उद्या चर्चेला बोलावण्यात आले आहे. त्यानंतर तरी त्यांच्या घरी प्रकाश पोचेल का, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 

याबाबत माहिती देताना जाधव म्हणाले, ‘‘त्यांचे कुटुंब वडिलोपार्जित सामायिक जमिनीत असलेल्या जुन्या घरात वास्तव्यास आहेत. या घराचे बांधकाम १९६२ मध्ये करण्यात आले आहे. घर असलेल्या जमिनीच्या सातबारावरील हिस्सेदारांनी नोव्हेंबर महिन्यात महावितरण कंपनीच्या दापोली उपविभागाकडे पत्रव्यवहार करून जाधव कुटुंबीयांच्या घराचा वीजपुरवठा बंद करण्याची मागणी केली. या मागणीनुसार विद्युत वितरण कंपनीने ११ नोव्हेंबरला वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे शाळकरी मुलांना मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करण्याची वेळ आली आहे. 

रामचंद्र जाधव यांनी त्यांच्या नावे असलेल्या ग्रा. पं. घर क्र. २०५ मध्ये वीजजोडणीसाठी अर्ज केला. मात्र सामायिक जमिनीतील सहहिस्सेदारानी हरकत घेतल्याचे सांगत महावितरणने वीजपुरवठा करण्यास नकार दिला. याच जमिनीतील एका घरात वीजपुरवठा इतर हिस्सेदारांच्या सहमतीशिवाय सुरळीत सुरू असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. इतर हिस्सेदारांचा वीजपुरवठा बंद करण्याच्या मागणीचा अर्ज महावितरणला देऊनही त्यावर मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

महावितरणने घेतलेल्या दुटप्पी भूमिकेकडे श्री. जाधव यांनी दापोली तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात लक्ष वेधले आहे. याबाबत दापोली तहसीलदार कविता जाधव, नायब तहसीलदार शंकर कोरवी यांनी दखल घेतली असून, उद्या (ता. ३) तहसील कार्यालयात चर्चेसाठी बोलावले आहे.

Web Title: electricity demand by jadhav family