विजेच्या खेळखंडोबाचा पर्यटनावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

आंबोली- परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक हैराण झाले आहेत. संतप्त पर्यटन व्यावसायिकांनी बिल भरणार नसल्याचा इशारा दिला आहे. आंबोलीत गेली दोन वर्षे विजेच्या समस्यांबाबत तक्रारी वाढत आहेत. 

यापूर्वी जास्त पाऊस असतानाही कधीही वारंवार तक्रारी नसायच्या; मात्र कर्मचारी असूनही कामे केली जात नाहीत. याआधी येथे स्थानिक व परिसरातीलच वीज कर्मचारी असल्याने सुटीवर जाण्याचा व काम न करण्याचा प्रश्‍न नव्हता; मात्र दोन वर्षांपासून कामात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. पावसाळ्याआधी सर्व वीज वाहिन्या व्यवस्थित करून घेणे गरजेचे असताना वारंवार सांगूनही याकडे डोळेझाक झाली. त्यामुळे आंबोली परिसरात विजेच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेले दोन महिने रात्रीची व दिवसाची अनेक वेळा वीज गायब होते. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पर्यटकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे अनेक पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. आंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांनी याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. सामुदायिक वीज बिले भरणार नसल्याचा इशारा हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे. याबाबत महादेव भिसे यांनी तक्रार दिली आहे. 

Web Title: Electricity effect on konkan tourism results