महावितरण कंपनीच्या कारभाराचा वीज ग्राहकांना मनस्ताप

अच्युत पाटील
शनिवार, 2 जून 2018

सदर उपकेंद्रातील उच्च क्षमतेच्या रोहित्रातून मागील सहा महिन्यांपासून तेल गळती सुरू झाली होती.परंतु संबंधित अभियंत्यानी या कडे दुर्लक्ष केल्याने तसेच उकाडा वाढल्याने वीजेची मागणी वाढू रोहित्रावर अधिक ताण पडल्याने शुक्रवार दिनांक1 जून रोजी रोहित्र गरम होऊन बंद पडले.

बोर्डी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे बोर्डी परिसरातील पाच गावे रात्रभर अंधारात राहिल्याने ऐन उकाड्यात वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. महावितरणच्या, बोर्डी (वहिंद्रा) येथील उपकेंद्रातून बोर्डी, घोलवड, जांबुगाव, अस्वाली, झाई-बोरीगाव या पाच गावातील हजारो ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.

सदर उपकेंद्रातील उच्च क्षमतेच्या रोहित्रातून मागील सहा महिन्यांपासून तेल गळती सुरू झाली होती.परंतु संबंधित अभियंत्यानी या कडे दुर्लक्ष केल्याने तसेच उकाडा वाढल्याने वीजेची मागणी वाढू रोहित्रावर अधिक ताण पडल्याने शुक्रवार दिनांक1 जून रोजी रोहित्र गरम होऊन बंद पडले.

सदर घटनेची माहिती वरिष्ठ अभियंत्याना देवूनही वेळीच दखल न घेतल्याने सकाळी सात वाजता बंद पडलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात हलगर्जीपणा केल्याने ग्राहाकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. शेकडो ग्राहक उपकेंद्रावर येवून कर्मचाऱ्यांना जाब विचारु लागले. ग्राहकांचा रोष वाढल्याने कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपकेंद्रात येण्याची विनंती देखील केली परंतु डहाणू विभागातील एकही अभियंता फिरकला नाही.

अखेर ग्राहकांचा प्रचंड दबाव वाढल्याने रात्री उशिरा वसई येथून वरिष्ठ अभियंत्यांची टी उपकेंद्रात दाखल झाली परंतु अंधारात काम करणे अशक्य होते. स्थानिक तरुणांनी जनरेटरची व्यवस्था करून दिल्या नंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली परंतु शनिवारी सकाळ पर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले नाही. महावितरणच्या महा गलथान कारभारामुळे मात्र बोर्डी परिसरातील हजारो ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात रात्रभर अंधारात राहून उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

Web Title: electricity problem in Bordi

टॅग्स