वीज घोटाळाप्रश्नी गोव्यात सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पणजी - गोव्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्याविरोधातील वीज घोटाळा प्रकरणाची सुनावणी पणजीच्या सत्र न्यायालयात उद्यापासून (ता.१५) सुरु होणार आहे. माविन गुदिन्हो काँग्रेस सरकारच्या काळात वीजमंत्री असताना त्यांनी हा. घोटाळा केल्याची तक्रार तत्कालीन विरोधी पक्षाचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी पोलिसात केली होती.

गूदिन्हो आता पर्रीकर यांच्याच मंत्रीमंडळात मंत्री आहेत. गुदिन्हो यांनी या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुमारे १२ वर्षे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस हिरवा कंदील दाखवला आहे. मागील तारखेस गुदिन्हो दिल्लीला गेल्याने सुनावणीस हजर नव्हते म्हणून ती सुनावणी सुरु झाली नव्हती. आता उद्या त्यांच्या उपस्थितीत ही सुनावणी सुरु होईल. 

या खटल्यात सामाजिक कार्यकर्ते अॅड आयऱीश रॉड्रिग्ज यांनी हस्तक्षेप याचिका सादर केली आहे.

Web Title: Electricity scam: hearing in Goa