सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दितील गावांमधील विजेचे खांब धोकादायक

अमित गवळे
बुधवार, 16 मे 2018

पाली - सिद्धेश्वर बू. ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर, खांडसई, पुई,  वावळोली गाव व आश्रमशाळा, तसेच कळंब आदिवासीवाडीवरील विजेचे खांब धोकादायक झाले आहेत. जीर्ण, वाकलेले व मोडकळीस आलेले हे खांब केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे मोठी जिवितहानी होण्याचा धोका आहे. यासंदर्भात अर्ज-विनंत्या करुनही विज वितरण कार्यालयाकडून कुठलीही कारवाई केली गेलेली नाही.

गावांतील धोकादायक खांब व खांबांवरील दिवे बदलण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादीत, सुधागड पाली यांना ३० जानेवारी व ८ एप्रिल रोजी अर्ज पाठविण्यात आले आहेत. ८ एप्रिलच्या अर्जाची एक प्रत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता, पेण, कार्यकारी अभियंता रोहा, जिल्हाधिकारी रायगड, आमदार धैर्यशिल पाटील, व तहसिलदार पाली-सुधागड यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. मात्र या गंभीर परिस्थिती संदर्भात अजुनही कोणती कारवाई केली गेलेली नाही. 

यातील एक धोकादायक खांब वावळोली येथील आदिवासी आश्रमशाळेपासून काही अंतरावर आहे. तर इतर खांब लोकवस्ती जवळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात व वादळी वा-यामुळे हे खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. परिणामी या धोकादायक खांबांमुळे ग्रामस्थ, विदयार्थी व जनावरांच्या जिवास धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी व वेळेत हे खांब बदलण्यात किंवा दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी गावक-यांनी केली आहे. यासंदर्भात सकाळने पाली विजवितरण कार्यालयाचे उपअभियंता मुकेश गजभिये यांना विचारले असता सिद्धेश्वर येथील काही कामे झाली आहेत. इतर शिल्लक असलेली कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करू असे सांगितले.

विज वितरण कार्यालयाकडे याबाबत वारंवार लेखी व तोंडी तक्रार केली आहे. खांब बदलण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध नाही असे सांगण्यात येते. पावसाळा तोंडावर आल्याने खांब वेळीच बदलले गेले नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामूळे विजवितरण कंपनी, प्रशासन व लोकप्रतिनीधींनी या संदर्भात त्वरीत कार्यवाही केली पाहीजे.
- उमेश यादव, सरपंच, ग्रुप ग्रामपंचाय, सिद्धेश्वर बू.

Web Title: The electrisity column in the village is dangerous