इमर्जन्सी लायटिंग मशीन ठरली निरुपयोगी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

रत्नागिरी - पालिकेच्या अग्निशमन दलाला शासनाने सुमारे अडीच लाखांचे पोर्टेबल इमर्जन्सी लायटिंग दोन मशीन दिली आहेत. रात्री आग लागल्यास किंवा आपत्तीच्या काळात प्रकाशासाठी त्याचा वापर होतो. गोखले नाका येथे मध्यरात्री लागलेल्या आगीवेळी त्याची गरज होती. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अग्निशमन दलाला त्याचा वापर करता आला नाही. 

शहरात शुक्रवारी (ता.६ ) मध्यरात्री बाजारपेठेतील गोखले नाका येथे आग लागली. या आगीमध्ये चार दुकानांचे सुमारे बारा लाखांवर नुकसान झाले. काळोख असल्याने मदतकार्यात अनेक अडथळे आले.जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाला फोन करून सर्च लाईट मागविले होते. मात्र तेथूनही ते उपलब्ध झाले नाहीत. आग विझविण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अग्निशमन दलाकडे पोर्टेबल इमर्जन्सी लायटिंग मशीन आहे.हे मशीन सुमारे २० ते ३० फूट उंच होऊन प्रकाश देते. अग्निशमन दलाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने लाखो रुपयांच्या दोन्ही मशीन पेटीबंद ठेवाव्या लागल्या. बाजारपेठेमध्ये आग लागल्यानंतर  महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. अग्निशमन विभागाने महावितरणच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. मात्र पुढील अनर्थ टळण्यासाठी महावितरणणे घेतलेली ही खबरदारी होती. 

अरुंद रस्ते, वाहनांची झाली अडचण
शहरातील मुख्य बाजारपेठेतील अरुंद रस्ते, त्यात रस्त्यात वाहने त्यामुळे अग्निशमन बंब नेताना अडचणी आल्या. अखेर चालकाला बंब मागे (रिव्हर्स) घेऊन दुसऱ्या वाटेने आणावा लागला. पालिकेने याचा गांभीर्याने विचार करून भविष्यात अशी मोठी दुर्घटना घडल्यास बंब घटनास्थळी कसा पोचेल, यावर विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Emergency lighting was useless machine