अभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

खामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत असताना अज्ञातांनी खारेपाटण जिल्हा सिंधुदुर्ग येथे मारहाण केली. याचा निषेध म्हणून व दोषी व्यक्तिना शिक्षा होण्याची मागणी करण्यासाठी आज खामगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी आज बुधवारी काळ्या फिती लावून कामकाज केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ, मु. कणकवली यांच्या कार्यक्षेत्रातील खारेपाटण येथील शासकीय विश्रामगृह परिसरात असलेले वडाचे  मोठे झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याची माहिती समजताच कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले असताना स्थानिक सरपंच व इतरांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जबर मारहाण केली.

या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच वाढत्या गुंड प्रवृत्तीला आळा बसावा याकरिता संबंधित मारहाण करणाऱ्या दोषी व्यक्तीना शिक्षा व्हावी या मागणीसाठी व घटनेच्या निषेधार्थ   आज बुधवारी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. यामध्ये खामगाव  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे,उपविभागीय अभियंता  प्रवीण पुंडकर ,उपविभागीय अभियंता सचिन तायडे ,शाखा अभियंता सागर धोटे,किशोर मिश्रा,यासह विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी व कंत्राटदार वर्ग सहभागी झाले.

Web Title: employees works with black strip because of misbehave of engineer