कोकण रेल्वे मार्गावर इंजिन घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प

engine
engine

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान माल वाहतूक करणार्‍या रेल्वेचे इंजिन घसरले. पहाटे 4.45 च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर सुमारे तीन तास कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी 7.10 वाजता ही वाहतूक पूवर्वत करण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी आणि नांदगावच्या दरम्यान आज (ता. 1) पहाटे माल वाहतूक करणार्‍या रेल्वेच्या इंजिनाचे एक चाक रूळावरून घसरले. त्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग बंद झाला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर कोकण रेल्वे यंत्रणेतर्फे तातडीने दुरूस्तीची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर रूळावरून घसरलेले चाक सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास काम पूर्ण करून पुन्हा चाक बसविले आणि ती गाडी मार्गस्थ केली. या दरम्यान पहाटे 4.45 पासून बंद असलेली कोकण रेल्वे 7.35 वाजता पूर्ववत झाली. 

रत्नागिरीकडून मडगावकडे जाणारी पॅसेंजर गाडी पहिल्यांदा या मार्गावरून धावली. त्यानंतर कोकणकन्या व इतर गाड्या रवाना करण्यात आल्या. रेल्वे इंजिन घसरल्यामुळे अप मंगला एक्सप्रेस तब्बल साडे पाच तास विलंबाने धावत होती. त्यापाठोपाठ डाऊन कोकणकन्या आणि डाऊन मंगलोर एक्सप्रेस या गाड्या साडे तीन तास उशिरा धावत होत्या. तर मडगाव एलटीटी अडीच तास आणि कोचिवली दादर ही गाडी साडे चार तास विलंबाने धावत होती.

यंदा अतिपाऊस असूनही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. चार दिवसापूर्वी खेड येथे रेल्वे मार्गावर दगड आला होता. रेल्वे कर्मचार्‍यांच्या दक्षतेमुळे ही बाब वेळीच उघड घाली होती. त्यानंतर आज नांदगांव-वैभववाडी दरम्यान रेल्वे इंजिनाचे चाक रूळावरून घसरले होते.

उशिराने धावणाऱ्या गाड्या
10111 कोकणकन्या 3 तास 11 मी
11003 तुतारी एक्स्प्रेस 1 तास 48 मी
11086 डबल डेकर 2 तास 30 मी
12617 मंगला एक्स्प्रेस 5 तास 18 मी
16335 नागरकोईल 2 तास 23 मी
16346 नेत्रावती 2 तास 35 मी
19331 कोचीवली इंदोर 4 तास 14 मी
22629 दादर टेन 2 तास 58 मी
22659 कोचीवली दादर 4 तास 46 मी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com