चिपीमध्ये वीज पुरवठ्यासाठी 95 कोटींचे अंदाजपत्रक 

चिपीमध्ये वीज पुरवठ्यासाठी 95 कोटींचे अंदाजपत्रक 

कणकवली - चिपी येथील विमानतळासाठी मालवण कुंभारमाठ, वेंगुर्ले येथून वीज पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी मालवण कुंभारमाठ ते चिपी विमानतळ अशा भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी 95 कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हा प्रस्ताव सात दिवसांत आरआरबी कंपनीकडे पाठविणार आहेत. त्या कंपनीकडून निधी मिळताच भूमीगत वीज वाहिन्यांच्या कामाला सुरवात होईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन महावितरणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी चिपी विमानतळाला होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्याबाबतची माहिती अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी दिली. 

यापूर्वी मालवण कुंभारमाठ ते चिपी विमानतळापर्यंत वीज तारा टाकून वीज पुरवठा करण्याचे प्रथम प्रस्तावित होते; पण रहिवासी भागात त्याला विरोध झाला. त्यामुळे रहिवासी भागात भूमिगत तर इतर ठिकाणी वीज खांबावरून वीज पुरवठ्याचे काम सुरू केले; पण तेथेही विरोध झाला. त्यामुळे कुंभारमाठ ते चिपी विमानतळापर्यंत भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याचे निर्देश उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यानुसार आम्ही 95 कोटींचा भूमीगत वीज वाहिन्यांचा आराखडा तयार केला आहे अशी माहिती पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, ""चिपी विमानतळ हा महत्वाचा प्रकल्प आहे. या विमानतळाला अखंडित वीज पुरवठा देणेही तेवढीच महत्वाची बाब आहे. त्यामुळे भूमीगत वीज वाहिन्या हाच पर्याय योग्य ठरू शकतो. कुंभारमाठ येथून होणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या तर पर्यायी व्यवस्था म्हणून वेंगुर्लेतूनही चिपी विमानतळापर्यंत वीज जोडणी दिली जाणार आहे. त्याबाबतच्या कामाचाही प्रस्ताव चिपी विमानतळाची जबाबदारी असलेल्या आयआरबी कंपनीकडे पाठविणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com