पर्यावरण संवर्धनासाठी लहानग्यांनी घेतला वृक्ष लागवडीचा वसा..

अमित गवळे
शुक्रवार, 4 मे 2018

पाली (रायगड) : पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर वृक्ष लागवड केलीच पाहीजे. या उक्तीने राजिप शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी शाळेत उन्हाळी शिबीर अंतर्गत मातीकाम उपक्रमाद्वारे लहानग्यांकडून सीड बाॅल (बँक) तयार करुन घेतले. हि सर्व मुले अाता अापल्या अाजुबाजुच्या परिसरात सीड बाॅल (बँक) टाकून वृक्ष लागवड करणार अाहेत.

पाली (रायगड) : पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर वृक्ष लागवड केलीच पाहीजे. या उक्तीने राजिप शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी शाळेत उन्हाळी शिबीर अंतर्गत मातीकाम उपक्रमाद्वारे लहानग्यांकडून सीड बाॅल (बँक) तयार करुन घेतले. हि सर्व मुले अाता अापल्या अाजुबाजुच्या परिसरात सीड बाॅल (बँक) टाकून वृक्ष लागवड करणार अाहेत.

राजिप शाळा पिलोसरी येथे मातीकाम अंतर्गत सीड बँक हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. मुलांनी वर्षभर साठविलेल्या विविध झाडांच्या बियांचा कल्पकतेने वापर केला गेला. कारण या बिया नुसत्या इकडे तिकडे फेकून दिल्यावर त्यांना कीड, मुंगी, कीटक लागून शकतात परिणामी त्यांची रुजवणूक होऊ शकत नाही. या बिया पावसाळ्यापर्यंत टिकाव्यात व त्याची रुजवणूक व्हावी यासाठी मुलांनी शाळेत माती व शेणाचे छोटे बॉल करून त्यात या विविध बिया टाकल्या. अंबिके यांनी सांगितले की आता हे सीड बॉल रस्त्याच्या कडेला तसेच कमी झाडे असलेल्या परिसरात व रानमाळावर फेकण्यात येतील.मातीच्या सीड बॉलवर पाणी पडून त्या बिया जमिनीत छान रुजतील. उन्हाळी सुट्टीत हे सिडबॉल विद्यार्थी अापल्याबरोबर विविध ठिकाणी घेऊन जातील व इतरत्र टाकतील. शिवाय यापुढे हे सीड बॉल विविध कार्यक्रमांना देखिल वाटप करता येवू शकतील. आज सर्व विद्यार्थ्यांनी हे सीडबॉल बनवण्याचा आनंद घेऊन वृक्ष लागवडीचा वसा घेतला.

खेळ, मज्जा अाणि पर्यावरण संवर्धन
मुलांना बाॅल फेकायला मज्जा वाटते. हा सीड बाॅल फेकण्याचा खेळाने मुलांना अतिशय मज्जा अाणि अानंद वाटला. शिवाय यामध्ये बिया असल्याने अापण खेळा बरोबरच नकळ वृक्ष लागवड सुद्धा करत अाहोत हे समाधान देखिल मुलांना मिळेल. त्याबरोबरच वृक्ष लागवडीचा संस्कार, संदेश देखिल त्यांच्यात रुजला.

13 कोटी वृक्ष लावण्याचे लक्ष शासनाचे आहे. शालेय परिसरात इतकी जागा उपलब्ध नसते. त्यामूळे या सीड बाॅलच्या माध्यमातून शाळा, गाव, माळरान, ओसाड जागा अादी परिसरात अनेक वृक्ष नक्कीच रुजतील. विवीध लग्न व धार्मिक समारंभ तसेच पार्टी अशा ठिकाणी सीडबाॅल भेट म्हणून दिल्यास ही चळवळ अधिक प्रभावी होईल.

- राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक, राजिप शाळा पिलोसरी

अाम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली माती व शेण अाणले त्याचा बाॅल केला अाणि त्यात साठविलेल्या बिया टाकल्या. हे सर्व करतांना खूप मज्जा अाली. हा सीड बाॅल अात्ता अाम्ही सर्वजण विविध ठिकाणी फेकणार आहोत. ज्यामुळे तिथे नवी झाडे वाढतील. तसेच अाता घरी सुद्धा आम्ही अशा प्रकारे सीडबाॅल बनवून अामच्या मित्रांना व गावातील लोकांना देवून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे काम करणार आहोत.

- सार्थक धोंडू चव्हाण, इयत्ता तिसरी, राजिप शाळा पिलोसरी

Web Title: environmental promotion by children