ईपीएस पेन्शनधारकांना मिळणार लवकरच वाढ - संजय नागवेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

रत्नागिरी - निवृत्त कर्मचारी १९९५ (ईपीएस) समन्वय समितीच्या लढ्यास अभूतपूर्व यश लाभले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सचिव संजय नागवेकर यांनी दिली. ८ मेच्या आदेशानुसार ईपीएस ९५ च्या पेन्शनधारकांना वयाची ५८ वर्षांपर्यंत सेवा २० वर्षांहून अधिक केली असेल त्यांना २ वर्षांची वाढ मिळणार आहे. तसेच २० वर्षांहून अधिक सेवा व स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली त्यांनाही दोन वर्षांचे वेटेज (वाढ) मिळणार आहे. ही वाढ लवकरात लवकर देण्याचे आदेश संबंधित क्षेत्रीय सहायक आयुक्तांना त्याच परिपत्रकात नमूद केले आहे.

या परिपत्रकाचा लाभ देशातील १८८ उद्योग व्यवसायांतील कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामध्ये विद्युत कंपन्या, सहकारी बॅंका, कारखाने, गिरणी कामगार, सूत गिरणी वस्त्रोद्योग, खासगी शाळा, रुग्णालये, सहकारी संस्था, खासगी उद्योगधंदे, रेसकोर्स, दूध सोसायटी, पतसंस्था आदींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन विकली असेल त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

देशातील ५८ लाख निवृत्त कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून २०११ पासून विविध राज्यांतून केंद्र शासन व अपर केंद्रीय आयुक्तांकडे मिळणाऱ्या अल्प पेन्शनबाबत दाद मागत होते. केंद्र शासनाने जुलै २०१६ ला प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची ५८ वर्षे पूर्ण होईपर्यंत नोकरी केली व २० वर्षांहून अधिक सेवा केली त्यांना दोन वर्षे वेटेज मंजूर केला होता. ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली किंवा ज्यांची कंपनी बंद पडली किंवा दुसऱ्या कंपनीत समाविष्ट झाली, त्यामुळे इच्छा नसतानाही सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागली, अशा कर्मचाऱ्यांना वरील शासन आदेशानुसार २ वर्षांचे वेटेज मिळाले नाही. नव्या शासन आदेशमुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर झाल्यामुळे संघटनेने समाधान व्यक्त केले. तसेच निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या कार्याला भविष्यात सक्रिय पाठिंबा देण्यास पेन्शनर्स तयार असतील, असे संजय नागवेकर, केंद्रीय कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य आर. के. धुरी, तुकाराम मलमे, संजय आंबेकर, कृष्णा कालबे, रामचंद्र भोजे यांनी सांगितले.

Web Title: eps pension growth