रायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे

अमित गवळे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या भिंतींना, लाद्यांना व खिडक्यांच्या काचांना तडे गेले अाहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. आक्रमक ग्रामस्तांनी सदर कामाची चौकशी करुन सबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या भिंतींना, लाद्यांना व खिडक्यांच्या काचांना तडे गेले अाहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. आक्रमक ग्रामस्तांनी सदर कामाची चौकशी करुन सबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत रा.जि.प सदस्य रविंद्र देशमुख यांनी पाली सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर व पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तहसिलदार बि.एन. निंबाळकर व पोलीस निरिक्षक दशरथ पाटील, नायब तहसिलदार वैशाली काकडे, पोलीस उपनिरिक्षक एन.डी चव्हाण, तलाठी एम.बी.इंदोळे, सर्कल जाधव, सचीन वाघ आदिंनी गुरुवारी (ता.19) घटनास्थळी पोहचून सुरुंग व स्फोटक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्तांनी सबंधीतांवर गुन्हे दाखल करा अन्यथा उपोषणास बसणार असल्याचा इशारा महसूल प्रशासनाला दिला आहे. येथील पी.आर.सी प्रा.लि. कंपनी व पद्दमावती ट्रेडींग कंपनी यांच्या माध्यमातून उन्हेरे कार्यक्षेत्रात दगड खाणीत बोअर ब्लास्टींगचे (सुरुंग स्फोटाचे) काम सुरु आहे. उन्हेर गावासह अन्य परिसराला सुरुंग स्फोटाचे जबर हादरे बसत आहेत.येथील उन्हेरे बुद्रुक, उन्हेरे, आदिवासीवाडी, पिलोसरी,पिलोसरी आदिवासीवाडी येथे किमान दोन हजारच्या आसपास लोकवस्ती आहे. त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदीचा आदेश देताना १६ मार्चपासून खान व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. अशाप्रकारे अचानक बंदी आल्यास गैरसोय होणार असल्याची जाणून हळहळू व्यवहार कमी करण्याच्या सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. परंतू जिल्ह्यात अनेक ठिकाणी या आदेशाचा उद्देश धाब्यावर बसवून सतत काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.

या सुरुंग स्फोटाच्या हादर्‍याने येथील नागरीक भितीच्या सावटाखाली जिवन जगत आहेत. या स्फोटाने भूभागाला हादरे बसत असल्याने घरे कोसळून जिवीतहाणी घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागात चालणारे दगड खाणीचे काम त्वरीत बंद करावे.

- रविंद्र देशमुख, सदस्य, रायगड जिल्हा परिषद

सुरुंग स्फोटामुळे होत असलेल्या नुकसानीबाबत ग्रामस्तांनी दिलेल्या तक्रारीची ताडीने दखल घेतली आहे.सदर काम बंद ठेवण्याच्या सुचना सबंधीत कंपनीला देण्यात आल्या आहेत. या भूभागात होणार्‍या सुरुंग स्फोटाचे पंचनामे केले जात असून याबाबतची नियमावली तपासून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

- बि.एन. निंबाळकर, तहसिलदार पाली सुधागड

Web Title: The eruption of stone mines bursts into houses