सावंतवाडी- घराच्या बांधकामावेळी आढळली गुहा

अमोल टेंबकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

सावंतवाडी : कुणकेरी भवानीवाडी येथील पाडुरंग गंगाराम सावंत हे नवीन घर बांधत असताना त्यांच्या खोद कामावेळी एक गुहा आढळून आली आहे. ही गुहा पूर्वीच्या काळी गृप्तधन ठेवण्यासाठी वापरली जात असावी, असा अंदाज तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या घराण्याला संस्थानकालीन वारसा आहे.

कुणकेरी भवानीवाडी येथील पाडुरंग सावंत हे आपले जुने घर पाडून त्याच जागेवर नवीन घर बांधत आहेत. त्यांच्या जुन्या घराने शंभरी ओलंडली आहे. याच घराच्या अगोदर जे घर होते ते संस्थानकालीन घर म्हणून ओळखले जात होते. त्या घराचे काही अवशेष शिल्लक ठेवूनच काही वर्षापूर्वी हे घर बांधले होते. पण आता नव्याने घराची बांधणी करत असताना खोदकाम करण्यात आले. हे खोदकाम करतानाच ही गुहा आढळून आली आहे.

ही गुहा साधारणत: साडेचार फूटखोल तर चार फूट रूंद अशीच आहे. गावातील ग्रामस्थांनी ही गुहा बघून आश्चर्य व्यक्त केले तर या गुहेला बंद करण्यासाठी झाकणासारखे दगडी आवरणही आहे. त्यामुळे संस्थानकालीन गुप्त धन ठेवण्यासाठीही अशा गुहेचा तेव्हा वापर केला जात असावा, असा अंदाजही तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ही गुहा पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: esakal marathi news sawantwadi news