हळदीकुंकू कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीची जोपासना

अमित गवळे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पाली: सुधागड तालुका मराठा समाज महिला आघाडीच्या वतीने नुकताच हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. येथील मराठा समाज भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महिला सक्षमीकरण व सामाजिक बांधिलकी जोपासणा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आला होता.

पाली: सुधागड तालुका मराठा समाज महिला आघाडीच्या वतीने नुकताच हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. येथील मराठा समाज भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महिला सक्षमीकरण व सामाजिक बांधिलकी जोपासणा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आला होता.

आजचे यूग हे स्पर्धेचे व संगणकीय यूग आहे. या युगात सक्षमपणे नेतृत्व करायचे असेल तर महिलांनी स्वावलंबी होणे गरजेचे अाहे.पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्द होणार्‍या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ लाभार्थी घटकाला मिळवून देण्या करीता मी प्रयत्नशिल अाहे. तसेच महिलांनी वैयक्तीक योजनांचा देखील लाभ घेण्याचे आवाहन सभापती साक्षी दिघे यांनी यावेळी केले. मराठा समाज महिला अध्यक्षा निहारीका शिर्के म्हणाल्या की हळदीकुंकू करण्याचा केवळ औपचारीक कार्यक्रम नाही. महिलांमध्ये समाजाप्रती प्रेमभावना निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जपणे असा व्यापक स्वरुपाचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. अशा कार्यक्रमातून महिलांमध्ये सामाजीक कार्याची आवड निर्माण होते.राष्ट्रपती अादर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या ताराबाई सकपाळ यांनी सांगितले की वीस वर्षापुर्वी या समारंभाची मुळी आम्ही लावली खरी,परंतू त्याला जिव धरला जात नव्हता. परंतू अध्यक्षा निहारीका शिर्के यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी या मुळीला असे खतपाणी घातले कि आता त्याचे रुपांतर विशाल कल्पवृक्षात होऊन त्याची फळे पाहावयांस मिळत आहेत. महिलांनी भविष्यात असेच संघटीत व एकजुटीने राहावे असे आवाहन सकपाळ यांनी केले.

यावेळी पनवेल येथी सनातन संस्थेच्या मांढरे यांनी महिला स्वसंरक्षणाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास सुधागड तालुका सभापती साक्षी दिघे, मराठा समाज सुधागड तालुका महिला आघाडी अध्यक्षा निहारीका शिर्के, सचिव स्नेहा भोईर, उपाध्यक्षा अनुराधा लखिमळे, खजिनदार जान्हवी सितापराव व ताराबाई सकपाळ आदिंसह महिला पदाधिकारी, सभासद उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा भोईर व विद्या सावंत यांनी केले. तर आभार जान्हवी सितापराव यांनी मानले.

 

Web Title: esakal marathi news sudhagad news