हे कार्यक्रम कोकणचे दर्शन घडविणारे- तटकरे

रविंद्र खरात
बुधवार, 23 जानेवारी 2019

कोकणातील माणसाची ताकद किती आहे हे आज या महोत्सवाच्या माध्यमातून दिसत असून राजकीय नेत्यांसोबत कलाकारांना एकत्र  कल्याण पूर्व मधील कोकण महोत्सवाच्या व्यासपीठावर आणले हे धाडसाचे काम असून या महोत्सवात होणारी प्रत्येक कला ही कोकणाच्या विविधतेचे दर्शन घडविणारे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी कल्याण पूर्व मधील कोकण महोत्सव मधील कार्यक्रमात केले.

कल्याण- कोकणातील माणसाची ताकद किती आहे हे आज या महोत्सवाच्या माध्यमातून दिसत असून राजकीय नेत्यांसोबत कलाकारांना एकत्र  कल्याण पूर्व मधील कोकण महोत्सवाच्या व्यासपीठावर आणले हे धाडसाचे काम असून या महोत्सवात होणारी प्रत्येक कला ही कोकणाच्या विविधतेचे दर्शन घडविणारे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी कल्याण पूर्व मधील कोकण महोत्सव मधील कार्यक्रमात केले.

कल्याण पूर्व मधील पोटे मैदान मध्ये उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी कोकण महोत्सव आयोजित करण्यात आले असून या महोत्सवाला शनिवार (ता. 19) जानेवारी रोजी सुरुवात झाली असून समारोप रविवार (ता.27) जानेवारी रोजी होणार आहे.

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे मंगळवार (ता.22) जानेवारी रोजी महाराष्ट्राची रणरागिणी हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्यानंतर तटकरे म्हणाले की, कल्याण डोंबिवली शहरात अनेक कलाकार राहत असून आजचा कार्यक्रम पाहून नक्कीच यातून कोकणाचे दर्शन घडत असल्याचे सांगत तटकरे पुढे म्हणाले की, कोकणातील अनेक नागरिक रोजगारासाठी मुंबई उपनगरात आले असून त्यातील बहुतांश नागरिक कल्याण डोंबिवली शहरात स्थायिक झाले आहेत. अशा माणसासोबत राजकीय नेत्यांना एकत्र आणून कोकण महोत्सवाचे व्यासपीठ दिल्याबद्दल आयोजकांचे तटकरे यांनी आभार मानले. तर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे कोकणात बरेच विकास काम करण्याची संधी मिळाली असून भविष्यात कल्याण मधील कोकणी बांधवांसाठी भविष्यात जे जे काही करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयन्त करेन असे आश्वासन तटकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार गणपत गायकवाड, आमदार भरत गोगावले, जगन्नाथ शिंदे आदींनी ही मार्गदर्शनपर भाषणे केली तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते हास्य अभिनेता जयवंत भालेकर, सारेगामा फेम बाल गायिका मानसी शेखर जोशी, वकील आणि उद्योगपती अमोल भोजने आदींना कोकण गौरवाने सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक निलेश शिंदे, सुनीता खंडागळे, परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, रमेश हनुमंते आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमात सूत्रसंचालक संदीप तांबे तर आभार प्रदर्शन कोकण महोत्सव आयोजक आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संजय मोरे यांनी मानले.

लोकसभा-विधानसभा निवडणूक पूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कल्याण पश्चिम टिटवाळा, डोंबिवली मध्ये आगरी कोळी समाजाचे महोत्सवानंतर कल्याण पूर्व मध्ये सलग दुसऱ्या वर्षी कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कोकणातील सर्व पक्षीय नेत्यांची हजेरी पाहता हम भी कम नही, निवडणूक जिंकायचा असेल तर कोकणातील नागरिकांना विश्वासात घ्या असे जणू संदेश या महोत्सवामधून देत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Web Title: This event is Showing culture Of kokan says sunil Tatkare