ऐन परीक्षेत शिक्षक बदल्यांचा घाट उधळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

रत्नागिरी - कमीकडून जास्तीकडे या निकषावर आधारित बदल्या आठ दिवसांत करा, असे आदेश संगमेश्‍वर, चिपळूण तालुक्‍यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले आहेत. या बदल्या सप्टेंबर, ऑक्‍टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत केल्या जातात; मात्र संचमान्यता नसल्याने त्या बदल्या मार्च महिन्यात परीक्षेच्या कालावधीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. त्याची गंभीर दखल घेत शिक्षण सभापती दीपक नागले यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिक्षण विभागाच्या बदल्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणांनी वादग्रस्त ठरतात. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांना जास्ती पटसंख्येच्या शाळांमध्ये नियुक्‍त करण्याची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात केली जाते. दरवर्षी ही प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येते; मात्र या वर्षी संचमान्यता झाली नाही व बदल्याही. १५ मार्च २०१७ ला संचमान्यता प्रक्रिया पूर्ण झाली. पुढील आठ दिवसांत सप्टेंबर महिन्यात रखडलेल्या कमीकडून जास्तीकडेच्या बदल्या तत्काळ कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाकडून संगमेश्‍वर आणि चिपळूण या दोन तालुक्‍यांना गेल्या. मार्च हा परीक्षांचा कालावधी. त्यात शिक्षक व्यस्त असतात. याच काळात बदल्या केल्यास शैक्षणिक कामकाजामध्ये गोंधळ निर्माण होईल, हे शिक्षक संघटनांनी निदर्शनास आणून दिले. शिक्षण सभापती श्री. नागले यांच्याकडे याबाबत तक्रारही केली गेली. त्याची गंभीर दखल घेऊन श्री. नागले यांनी उपशिक्षणाधिकारी महेश जोशी यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परीक्षा कालावधीत बदल्या करणे योग्य नसल्याने ही प्रक्रिया थांबवावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर रजेवर असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

शिक्षकांकडून दोन दिवसांपूर्वी याविषयी तक्रार मांडण्यात आली होती. त्याची माहिती घेतली असून अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. बदल्यांची प्रक्रिया आता घेणे योग्य नाही. ती थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दीपक नागले, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद.

Web Title: An examination of teacher transfers Wharf words