बिनशेती न केल्याने कारखान्याला सील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

खोपोली - बिनशेती परवाना न घेता बांधकाम केल्याप्रकरणी खालापूर तालुक्‍यातील ‘राजेश स्टील’च्या कार्यालयाला; तसेच एका उत्पादन विभागाला महसूल खात्याने टाळे ठोकले आहे. पोलादनिर्मिती करणारा हा कारखाना साजगाव-ढेकू मार्गावर आहे.

तालुक्‍यात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले आहे. परवानगीपेक्षा जादा बांधकाम करून उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर महसूल खात्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘राजेश स्टील’ने २० वर्षांपूर्वी कारखान्याच्या आवारात कार्यालयासाठी व उत्पादन करण्यासाठी शेड उभारली आहे. त्यासाठी बिनशेती परवाना घेतला नसल्याने महसूल खात्याने २६ डिसेंबर २०१६ रोजी नोटीस बजावून २ लाख ९ हजार रुपये दंड आकारला होता. कारखान्याने याकडे दुर्लक्ष केल्याने अधिपत्र नियम ९ अन्वये १३ जानेवारीला ही कारवाई करण्यात आली. साजगाव सजाचे तलाठी पवार, नाईक व ढेकूचे पोलिस पाटील सम्राट सुर्वे, ग्रामस्थ प्रकाश जळगावकर, सूरज पाटील यांच्या साक्षीने कार्यालय व उत्पादन विभागाला सील ठोकण्यात आले.

Web Title: factory sealed

टॅग्स