शेतकऱ्याला सोडवेना... पारंपरिक भाजावळ!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

श्रम आणि वेळ खर्च - ‘कळते पण वळत नाही’ अशी स्थिती
मंडणगड - जमिनीचा कस वाढावा व शेतात गवत वाढू नये यासाठी तालुक्‍यातील शेतकरी अजूनही चालत आलेल्या परंपरागत भाजावळीतून बाहेर येत नाही. परंतु शेतकऱ्यांसाठी श्रमिक आणि वेळकाढू असा फारसा फायदा न देणाऱ्या भाजावळीविषयी जनजागृती करून शेतीच्या फायद्यासाठी वेगळा पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत कृषी खाते आणि कृषी विद्यापीठ यांच्या प्रयत्नांना अद्याप पुरेसे यश आलेले नाही. भाजावळीबाबत शेतकऱ्यांची अवस्था ‘कळते पण वळत नाही’ अशी आहे.

सध्या तालुक्‍यातील शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे. पूर्वतयारीच्या कामांना त्यामुळे वेग आला आहे. येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात रानातील झाडांच्या फांद्या तोडून त्या जमिनीवर एकत्र करून ठेवतात. या फांद्या सुकल्यानंतर या फांद्या (कवळ) टोकदार जाड काठीत (बैला) भरून शेतात आणला जातो. गवत, सुकलेले शेण आणि सुकलेल्या झाडाच्या फांद्या शेतातील ज्या ठिकाणी भाजावळ करावयाची आहे, त्या ठिकाणी सम प्रमाणात पसरवले जाते. सकाळच्या वेळेत या तयार केलेल्या तणावर माती पसरवून त्याला आग लावली जाते. परंपरागत चालत आलेल्या या पद्धतीमुळे शेतात गवताचे प्रमाण कमी होते अशी शेतकऱ्यांची समजूत आहे. मात्र या भाजवळीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या अधिक आहेत. आणि त्याची गरजच नाही. भाजावळीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. याची जाणीव करून दिल्यानंतरही शेतकरी पारंपरिक भाजावळीपासून दूर होत नाही. शिवाय काही ठिकाणी कवळ तोडण्याबाबत काही श्रद्धेच्या बाबी आहेत. 

भाजावळीचे तोटेच अधिक
ही पद्धत श्रम खर्च करणारी, वेळकाढूपणाची आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. अनेक परिसर उजाड दिसतात. नवीन पालवी येण्यासाठी ही झाडे भूगर्भातील पाणीसाठा शोषून घेतात. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते. वृक्षतोड झाल्याने पावसाचे प्रमाण कमी होते, कार्बनडाय ऑक्‍साईड वाढतो. धुरामुळे वातावरणाचे प्रदूषण वाढते. आगीमुळे आजूबाजूचा परिसर धुरात झाकला जातो.

Web Title: farmer bhajawal