पालीत शेतकरी चिंतामण पवार यांचे उपोषण

अमित गवळे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील भेरव गावातील शेतकरी चिंतामण शंकर पवार हे बुधवारी (ता. 28) दुपारी पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याची त्यांची मागणी आहे.   

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील भेरव गावातील शेतकरी चिंतामण शंकर पवार हे बुधवारी (ता. 28) दुपारी पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याची त्यांची मागणी आहे.   

पवार यांच्या उपोषणाला सुधागड तालुका रि.पा.इंने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. सुधागड तालुक्यातील दहिगाव हद्दीतील आवंढे या ठिकाणी पवार यांची मालकी हक्काची शेतजमीन आहे. सदर जागेच्या शेजारी विकसक पागूर देसाई यांनी जमीन विकत घेवून या ठिकाणी बंगले बांधून विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. परंतू येथील आपल्या मालकी हक्काच्या 22 गुंठे जागेत संबधित विकसकाने अतिक्रमण करुन अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याचा आरोप शेतकरी चिंतामन पवार यांनी केला आहे. सरकारी सर्व्हेनुसार सदर जागेत अतिक्रमण झाले असल्याची कागदपत्रे समोर आले आहेत.

तसेच महसूल अधिकार्‍यांकडे याबाबत सातत्याने पत्रव्यवहार करुन देखील सबंधीतावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. विकासकावर अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करावा, त्यांना पाठिशी घालणार्‍या महसूल अधिकार्‍यांवर कारवाई करावी, संबंधित विकासकाने जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळवलेली (एन.ए) परवाणगी रद्द करावी, व केलेले बांधकाम अनधिकृत असल्याचे घोषीत करावे, आणि अनधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्या पवार यांनी केल्या आहेत. मागण्यांची पुर्तता होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

यावेळी रि.पा.इं सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, रविंद्रनाथ ओव्हाळ, भगवान शिंदे, दिलीप जाधव, दिपक पवार, सरपंच उत्तमराव देशमुख, के.टी.गायकवाड, रि.पा.इं सुधागड तालुका युवक अध्यक्ष निशांत पवार, संदेश शिंदे, सुशिल गायकवाड, आदिंसह ग्रामस्त उपस्थित होते.

Web Title: farmer chintaman pawar on hunger strike in pali