वाफेघर येथील उपोषणकर्ते शेतकरी शंकर पवार यांची प्रकृती खालावली

अमित गवळे 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पाली - सुधागड तालुक्यातील वाफेघर येथील शेतकरी शंकर पांडू पवार यांनी आपल्या जमीन मिळकतीचे संरक्षण कुळ महसुल प्रशासनाने बेकायदेशीरित्या कमी केल्याचा आरोप केला आहे. सबंधीत प्रशासनाविरोधात पवार पाली तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (ता.9) आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी बुधवारी (ता.12) पवार यांची प्रकृती खलावली आहे.

पाली - सुधागड तालुक्यातील वाफेघर येथील शेतकरी शंकर पांडू पवार यांनी आपल्या जमीन मिळकतीचे संरक्षण कुळ महसुल प्रशासनाने बेकायदेशीरित्या कमी केल्याचा आरोप केला आहे. सबंधीत प्रशासनाविरोधात पवार पाली तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (ता.9) आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी बुधवारी (ता.12) पवार यांची प्रकृती खलावली आहे.

उपोषणकर्ते पवार म्हणाले संरक्षित कुळ बेकायदेशीरीत्या कमी करुन प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात संविधानिक व शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण सुरु केले आहे. या प्रकरणी जो पर्यंत योग्य न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरुच राहील असे सांगितले. याबाबत शंकर पवार यांनी प्रशासनस्तरावर व मंत्रालयस्तरावर देखील पत्रव्यवहार केला आहे. 

वाफेघर येथील मालकी जमीन मिळकतीवर बनावट, बेकायदेशीर कागदपत्रे तयार करुन सदर बेकायदेशीर कागदपत्रांच्या अनुषंगाने शासनाची दिशाभूल करुन सबंधीत महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी मनमानी  शेरा दिला. सदर जमीन त्रस्त व्यक्तीस देवून आपल्याला भुमिहीन केले असल्याचे शंकर पवार यांनी म्हटले आहे. कौटुंबिक कुळ वारसा हक्काच्या जमीन मिळकतीत पांडू विठू पवार हे संरक्षण कुळ होते. परंतू, सदर मिळकतीबाबत महाराष्ट्र महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कुळ नष्ट करुन जमीन एका बड्या उद्योगपतीच्या घशात घातली असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. 

सद्यस्थितीत या जमीनीवर एका बड्या भांडवलदाराचे बेकायदेशीररित्या नाव लावण्यात आले असून, याकामी महसूल प्रशासनाचे सबंधित तत्कालीन तलाठी, सर्कल आदिंचा हस्तक्षेप असल्याचा आरोप शंकर पवार यांनी केला आहे. पाली तहसिल कार्यालयात या प्रकरणी न्याय मिळणेकामी वारंवार अर्ज विनंत्या करुन देखील प्रशासनाकडून सातत्याने वेळकाढूपणाची भुमिका घेतली जात आहे. प्रशासनामार्फत सहा महिण्यापासून केवळ आश्वासने दिली जात आहेत. याप्रकरणी बोलविण्यात येणार्‍या बैठकीत केवळ वेळकाढूपणा केला जातो. परंतू समाधानकारक निर्णय होताना दिसत नाही. 

दरम्यान, कुळ नष्ट होणे बाबतचे कारण व पुरावा मागितला असता कोणताही पुरावा उपलब्द नसल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचे यावेळी उपोषणकर्ते शंकर पवार यांनी सांगितले. न्याय देण्याच्या भुमिकेतून सबंधीत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असे ते म्हणाले.

Web Title: Farmer Shankar Pawar of Upazila farmer lowered his health