सुधागडमध्ये शेतकर्‍याची गळफास लावून आत्महत्या

अमित गवळे
मंगळवार, 15 मे 2018

सुधागड तालुक्यातील उध्दर येथिल नरेश महादेव लहाने (वय ४२) या शेतकर्‍याने मंगळवारी (ता.१५) पहाटे राहत्या घराशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या शेतकर्‍याचा मृतदेह सकाळी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र या ठिकाणी शवविच्छेदन कर्मचारी उपलब्ध नसल्याने नरेश लहाने यांचा मृतदेह बराच काळ पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर गाडीत ठेवण्यात आला. आत्महत्तेचे कारण अजुनही स्पष्ट झालेले नाही. 

रायगड  - सुधागड तालुक्यातील उध्दर येथिल नरेश महादेव लहाने (वय ४२) या शेतकर्‍याने मंगळवारी (ता.१५) पहाटे राहत्या घराशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या शेतकर्‍याचा मृतदेह सकाळी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र या ठिकाणी शवविच्छेदन कर्मचारी उपलब्ध नसल्याने नरेश लहाने यांचा मृतदेह बराच काळ पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर गाडीत ठेवण्यात आला. आत्महत्तेचे कारण अजुनही स्पष्ट झालेले नाही. 

महादेव लहाने यांनी आत्महत्या केली असल्याचे सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर पाली पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. कोलाड येथील डॉ. ज्योती वाघमारे यांनी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पालीत कायमस्वरुपी शवविच्छेदन कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतू असा कर्मचारी नसल्याने रात्री नातेवाईक व पोलीसांना मोठ्या समस्येला व त्रासाला सामोरे जावे लागते. 

जि.प सदस्य सुरेश खैरे यांनी पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून आरोग्य सेवा सुविधांचा आढावा घेतला. या बाबत पाली पोलीस स्थानकांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस. डी. पाटील करीत आहेत. सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा पुर्णपणे कोलमडली
 
सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा पुर्णपणे कोलमडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पाली व जांभुळपाडा या अंतर्गत समाविष्ठ असलेल्या 14 उपकेंद्रात विविध रिक्त पदे आहेत. सकाळने यासंदर्भात अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. 

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रासह जांभुळपाडा आरोग्य केंद्र व अन्य उपकेंद्रात अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांवर अधिक ताण पडतो. अशातच पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन कर्मचारी नसल्याने इतर ठिकाणाहून कर्मचारी बोलावून शवविच्छेदन करावे लागते. पालीत कायमस्वरुपी शवविच्छेदन कर्मचार्‍यांची नेमणुक केल्यास मृतदेहाचे तत्काळ शवविच्छेदन केले जाईल. कुटुंबियांच्या वेळेत मृतदेह ताब्यात देता येईल, असे मत यावेळी पाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॅा. रुस्तम दामले यांनी व्यक्त केले.

Web Title: farmer sucide in sudhagad