esakal | 'चंदन कन्या" नावाखाली शेतकऱ्यांची लूट 
sakal

बोलून बातमी शोधा

'चंदन कन्या" नावाखाली शेतकऱ्यांची लूट 

एक नजर

  • चिपळूण बाजारात 40 रुपये दराने मिळणारे चंदनाचे रोपाची 160 रुपयांना विक्री
  • चंदन कन्या योजनेच्या नावाखाली काही संस्थांकडून  शेतकऱ्यांची लुट. 
  • भविष्यात लाखाचे उत्पन्न मिळेल असे अमिष देवून जादा दराने चंदन रोपांची विक्री

'चंदन कन्या" नावाखाली शेतकऱ्यांची लूट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - बाजारात 40 रुपये दराने मिळणारे चंदनाचे रोप काही संस्था चंदन कन्या योजनेच्या नावाखाली 160 रुपये दराने शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. चंदनकन्या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट सुरू आहे. 

चिपळूणात एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. ज्यांच्या घरात मुलगी जन्माला येते. त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जातो. त्यांना चंदन कन्या योजनेची माहिती दिली जाते. बारावीपर्यंत अनुदानित शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण नि:शुल्क आहे. बारावीनंतरचा खर्च अनेकांना झेपणारा नसतो. यामुळे ग्रामीण भागातील मुली बारावीनंतर शिक्षण सोडत असतात. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे. यासाठी चंदनकन्या योजनेच्या माध्यमातून आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. 1 ते 10 वर्षे वयाची मुलगी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर 10 ते 20 चंदनाची झाडे लावायची आहे. ही झाडे 15 वर्षे सांभाळल्यावर म्हणजे 15 वर्षांत 20 चंदनाची झाडे लावल्यावर मुलीचे शिक्षण तसेच लग्नासाठी एकरकमी 15 ते 20 लाख रुपये संबंधित शेतकऱ्याला मिळतील, असे आश्‍वासन दिले जात आहे. एका शेतकऱ्याने 10 चंदनाची रोपे घेतली तर त्याच्याकडून 1600 रुपये घेतले जातात. मात्र बाजारात 400 रुपयात 10 रोपे मिळतात. मात्र भविष्यात लाखाचे उत्पन्न मिळेल असे अमिष देवून जादा दराने चंदन रोपांची विक्री सुरू आहे. 

चंदनाची लागवड करण्यास शेतकरी कुचराई करतात. चंदनाची चोरी होते, लागवडीला परवडत नाही आदी कारणांमुळे चांगले उत्पादन देण्याची क्षमता असूनही चंदनाची लागवड होत नव्हती. मात्र निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आम्ही चार वर्षात जिल्ह्यात एक लाखाहून अधिक चंदनाची रोपे मोफत वाटली आहे. पुणे येथील बीज पुरवठादार महेंद्र घागरे शेतकऱ्यांसाठी पाच रुपये दराने चंदनाची रोपे पुरवतात. 
- धीरज वाटेकर,  

निसर्ग प्रदूषण नियंत्रण मंडळ 

loading image