कर्जतच्या "ग्रीन झोन'विरोधात शेतकरी मोर्चा काढणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

कर्जत : कर्जत परिसरातील "ग्रीन झोन'साठी जाहीर झालेल्या नवीन अटींविरोधात येथील शेतकरी मंगळवारी (ता. 13) नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत. या अटींचा सर्वाधिक फटका निवासी बांधकामांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
"कॉम्रेड' संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष गोपाळ शेळके यांनी ही माहिती दिली. कर्जत शहरापासून लगतची आठ ते दहा किलोमीटरपर्यंतची गावे 2016 ते 2036 या कालावधीसाठी नव्याने "ग्रीन झोन'मध्ये समाविष्ट केली आहेत. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या जमिनींना कवडीमोल दर मिळणार आहे. बड्या भांडवलदारांना जमीनखरेदीसाठी हा निर्णय फायद्याचा आहे, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: farmers march against green zone