भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल

लक्ष्मण डुबे 
बुधवार, 11 एप्रिल 2018

रसायनी - रसायनी पाताळगंगा परीसरात दुबारा भाताच्या पिकांनी शेत बहरली आहे. तसेच सध्या पिक निसवू लागली आहे. मात्र मोहोपाडा परीसरात बहुतेक शेतक-यांच्या पिकावर खोडकिडा आणि काही शेतक-यांच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. 

पाताळगंगातील घेरा माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धारणाचा जांभिवली परीसरातील, तसेच पाताळगंगा नदी काठच्या गावांतील आणि मोहोपाडा येथील शेतकरी एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंद्रातुन सोडण्यात येणा-या सांडपाण्याचा दुबार भात शेतीला आधार घेतात. शेतकरी दरवर्षी भात पिक घेत आहे. सध्या भाताच्या पिकांनी शेत बहरली असुन कणस बाहेर पडू लागली आहे. 

खोडकिडा रोग पडल्याने पिकाचे काही प्रमाणात नुकसान होईल तर करपा रोग पडल्यामुळे पिक वाळु लागली आहे. या शेतक-याचे संपूर्ण पिक वाया जाईल आशी भिती शेतकरी व्यक्त करत आहे. या वर्षी खराब हवामानामुळे पिकावर लवकर रोग पडला आहे. रोगाचा नायनाट करण्यासाठी रासायनिक खत आणि किटक नाशके फवारली असली तरी त्याचा उपयोग झाला नाही असे शेतक-यांनी सांगितले. 

''खराब हवामानाचा परिणाम भाताच्या पिकावर जास्त होऊ लागला आहे. तर पिकांवर रोग पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भाताचे नुकसान होतच आहे. तर उंदीर भात कुरतडतात तसेच गावांतील मोकाट गुर आणि डुकर सुध्दा पिकाचे नुकसान करतात. पिकाच्या मशागतीवर होणारा खर्च आणि होणारे नुकसान त्यामुळे भात शेती परवडत नाही''.
वामन दळवी, शेतकरी 
 
Web Title: farmers rice crops Inflammation of the disease