बळीराजाला वरूणराजाची आस

बा.पू. गायकर
सोमवार, 18 जून 2018

लोहा : 'आम्ही कष्टाळू शेतकरी ...काळी आई आमुची पंढरी ...... पिढ्यान पिढ्यापासून कास्तकार म्हणुन स्विकारलं आहे... यंदाचं साल तरी चांगलं जाईल का ? ... सुरूवात तर चांगली झाली...पाऊस वेळेवर पडेल का? ... बियाणानं डोक्यावर बिगारी घेतली? वाळून तर जाणार नाही? अशा अनेक विचारांचं मोहळ डोक्यात घेऊन, चिंतेचा घास घेत, शेतकरी राजा जगतो आहे. 

खरिपातील पिकांत यंदा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्याची कापूस, सोयाबिन, ज्वारी, कडधान्य, हळद या पिकावर मदार आहे.पोटच्या मुलासारखं जीव लावणारा कृषकराजा पावसाअभावी चिंताक्रांत आहे. मृग नक्षत्राच्या पूर्वसंधेला दमदार पावसाने सुरूवात केली. दरम्यान लोकसहभागातून लोहा तालुक्यात गावोगाव बाधबंदिस्तीमुळे पाणी साठले. आजपर्यंत १७६ मिलिमीटर यवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस कापशी, वडेपूरी, कलंबर भागात झाला. पण दहा-बारा दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

पारंपारिक वानावर भर

सोयाबिन व अन्य कडधान्यात तूर, मुग, उडीद, तेलबियांचा समावेश करतांना शेतकऱ्यांनी घरी तयार केलेला बीवडाला पसंती दिली आहे. पहिल्या पावसावर खरिप पेरणी उरक्न शेतकरी पावसाची वाटलपहात आहे. रासायणिक खताची मात्रा कमी करत लिंबोळी पेंड, कंपोष्ट खत आणि गांडुळ खताला चांगली मागणी असल्याचे प्रयोगशील शेतकरी दिगंबर तुडमे, पंडीत राऊत यांनी सांगीतले.

अनुदानित ठिबक संचाची मदत वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. कृषी विभागाने अनुदान तत्वावर सरसकट सोयाबीन बियाणे वाटप केले नाही. यापुढे  किडनाशक शासनाने अनुदान तत्वावर द्यावीत अशी मागणी होत आहे. 

शेतकऱ्यांनी उघडिपीत पेरणी थांबवावी- विश्वंभर मंगनाळे

पावसाने दडू मारल्याने जमीनीतील ओल कमी झाली आहे. वाऱ्याचा वेगही वाढला आहे. तुरळक पावसाच्या सरी वगळता मोठा दमदार पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशी सुचना तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे यांनी केली आहे.

Web Title: farmers waiting for rain